Published On : Mon, Sep 7th, 2020

अर्धवट सिमेंट रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करा : महापौर

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका प्रशासनाने अर्धवट सिमेंट रस्यांe चे काम तात्काळ सुरु करावे, असे निर्देश महापौर श्री.संदीप जोशी यांनी सोमवारी दिले.

महापौर कक्षात सिमेंट रोडच्या कामाच्या संदर्भात आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना महापौर म्हणाले की, मागील सात महिन्यापासून कोव्हीड-१९ मुळे शहरातील अनेक सिमेंट रस्या्भचे काम अर्धवट स्थितीत पडले आहे. याचा नागरिकांना बराच त्रास देखील होत आहे.

विशेषत: पावसाळयामध्ये अर्धवट सिमेंट रस्यााचच्या कामामुळे अनेकांच्या घरी पाणी देखील शिरले आहे ही स्थिती अत्यंत दयनीय आहे. कोव्हीडच्या परस्थितीत कोव्हीडवर लक्ष असणे अत्यंत स्वाभाविक आहे परंतु शहरातील अर्धवट असणा-या सिमेंट रोडची कामे देखील करणे गरजेचे आहे तरी या संदर्भात पुर्ण माहिती घेऊन तीन दिवसात अधिक्षक अभियंता श्री तालेवार यांनी आपला अहवाल दयावा व तात्काळ अर्धवट सिमेंट रोडच्या कामाला प्रारंभ करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीत मा.महापौर श्री.संदीप जोशी यांचेसह सभापती वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती श्री. विरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त श्री.संजय निपाणे, अधिक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी श्री. हेमंत ठाकरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.