Published On : Mon, Oct 15th, 2018

टेकाडी बस थांबा पासुन स्टार बस सेवा सुरू

कन्हान : – कित्तेक दिवसांपासून कन्हान क्षेत्रातील जे.एन.हॉस्पिटल ते बर्डी सुरू असलेली स्टार बस सेवा मध्यंतरी बंद करण्यात आली होती . ही पुन्हा सुरू करून पुढे टेकाडी बस थांबा राम मंदिर पासुन सुरू करण्यात आली .

टेकाडी बस थांबा राम मंदिर येथे नागपूर जि.प.उपाध्यक्ष श्री.शरदजी डोनेकर, ग्रा.पं टेकाडीच्या सरपंचा सौ. सुनीता मेश्राम यांच्या हस्ते विधीवत पुजन करून स्टार बस सेवा सुरू करण्यात आली . भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अतुल हजारे यांचा अथक प्रायत्नाने ही बस सेवा पुढे टेकाडी राम मंदिर पर्यंत सुरु करण्यात आली. यामुळे टेकाडी व आजूबाजुच्या नागरिकांना स्टार बस ने प्रवास करने सोइचे झाले असुन वेळीची व आर्थिक बचत होईल.

या प्रसंगी ग्राम पंचायत टेकाडीचे सदस्य दिनेश चिमोटे, सौ.मीना झोड, सौ.सुरेखा कामळे गावकरी जे.पी. वर्मा, सुखनंदन ,पृथ्वीराज मेश्राम,अशोक हिंगणकर,बालचंद गुप्ता, मेवालाल पाल, विजय कोल्हे, रामणारायन शुक्ला, शिवलाल पराडकर, आशिष झोड, अनुप सिंह, नेल्सन, अजय सिंह, राकेश गौतम , आशुतोष, राहुल, अंकुल, बितन, शुभम, रामक्रिशन बिर्ऱ्हे, शुभम साही, पुरुषोत्तम , संजय पांडे, सुरेंद्र सिंह, रमता यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.