Published On : Mon, Oct 15th, 2018

वाचन प्रेरणा दिनाने महामहीम डॉ अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

Advertisement

कन्हान : – यशवंत विद्यालयात सर्व विद्यार्थ्यानी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे वाचन करून त्यातील बोध स्पष्ट केले. आणि ” वाचन प्रेरणा दिनाने भारताचे ११ वे राष्ट्रपती महामहीम डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली .

१५ ऑक्टोबर २०१८ ला यशवंत विद्यालय वराडा येथे माजी उपसभापती मा देवाजी शेळकी यांच्या अध्यक्षेत प्रतिष्ठीत नागरिक मारोतराव नागमोते , मुख्याध्यापिका के बी निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहीम डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून वाचन प्रेरणा दिनाची सुरूवात करण्यात आली. मान्यवरांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जिवन व कार्यावर सुंदर मार्गदर्शन केले .

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्यालयातील ग्रंथालयाचे विविध पुस्तके दर्शनिय ठेऊन सर्व विद्यार्थ्यांना वाचन करण्यात करिता देण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांनी थोर पुरूष, थोर महिला , थोर संत, वैञनिकांचे पुस्तक , गोष्टीच्या पुस्तका व ईतर पुस्तकांचे वाचन करून इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचुन त्यातील बोध आणि पुस्तके का वाचावित याविषयीचे महत्व सांगितले.

आणि वाचन प्रेरणा दिनाने महामहीम डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश गणवीर यांनी तर आभार प्रदर्शन शिंगणे मँडम हयानी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता राजेंद्र गभणे, सतिश कुथे , रोशन राऊत, मोतीराम रहाटे , दिपक पांडे , मोनाली चिखले, प्रिया गभणे , रूपाली चिखले तसेच विद्यार्थी , विद्यार्थींनीने सहकार्य केले .

Advertisement
Advertisement
Advertisement