Published On : Tue, Mar 20th, 2018

एम. ए., एम.एस.डब्‍ल्‍यू, बी.एस.डब्‍ल्‍यू, बी.वोक. बी.एड., बी.ए,बी.कॉम. ऑनर्स, सर्टिफिकेट, पीजी तथा एडवांस्‍ड डिप्‍लोमा अभ्यासक्रम उपलब्‍ध

Advertisement


वर्धा: महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात सत्र 2018-19 करिता प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. विश्‍वविद्यालयात एम.ए., एमबीए, एम.एड., एम.एस. डब्‍ल्‍यू., बी.एड., बी. वोक., इत्‍यादी अभ्‍यासक्रमांमध्‍ये इंफॉर्मेटिक्‍स एंड लैंग्‍वेज इंजीनियरिंग, हिंदी साहित्‍य, तुलनात्‍मक साहित्‍य, प्रयोजनमूलक हिंदी व भाषा प्रबंधन, उर्दू, मराठी, इंग्रजी, संस्‍कृत, मास्‍टर ऑफ परफार्मिंग आर्टस, गांधी व शांति अध्‍ययन, स्‍त्री अध्‍ययन, दलित व जनजातीय अध्‍ययन, बौद्ध अध्‍ययन, अनुवाद अध्‍ययन, प्रवासन तथा डायस्‍पोरा अध्‍ययन, जनसंचार, मानवविज्ञान, एमएसडब्‍ल्‍यू, शिक्षाशास्‍त्र, मनोविज्ञान, एमबीए, बी.ए. एम.ए. मानवविज्ञान (एकीकृत), बी.एड., एम.एड., बी. कॉम एवं बी. ए. ऑनर्स, भाषा विज्ञान, हिंदी, समाज शास्‍त्र, राज्‍य शास्‍त्र, इतिहास हे अभ्‍यासक्रम संचालित होत आहेत. सर्व अभ्‍यासक्रमांकरिता प्रवेशाचे अर्ज जनसंपर्क विभागात उपलब्‍ध आहेत. विश्‍वविद्यालयात एम.ए.च्‍या विद्यार्थ्‍यांना एक भारतीय किंवा विदेशी भाषा शिकविली जाते तसेच कम्‍प्‍यूटर हाही एक विषय शिकविला जातो. विविध विषयांमध्‍ये एम. फिल. आणि पी-एच.डी. करता येते.

सर्टिफिकेट, डिप्‍लोमा, पी. जी. डिप्‍लोमा, एडवांस्‍ड डिप्‍लोमाचे अनेक कोर्स येथे उपलब्‍ध आहेत. पीजी डिप्‍लोमामध्‍ये भाषा शिक्षण, भाषाविज्ञान, भाषा-प्रौद्योगिकी, पीजीडीसीए, देशज संस्‍कृती भाषा आणि जेंडर, गांधी अध्‍ययन, स्‍त्री अध्‍ययन, दलित विचार, बौद्ध अध्‍ययन, पालि भाषा व साहित्‍य, बौद्ध पर्यटन व गाइडिंग, तिब्‍बती भाषा व धर्म, अनुवाद, प्रयोजनमूलक हिंदी, निर्वचन, भारतीय डायस्‍पोरा अभ्‍यासक्रमांचा समावेश आहे. डिप्‍लोमा अभ्‍यासक्रमांमध्‍ये फोरेंसिक सायंस, योग व स्‍वास्‍थ्‍य अध्‍ययन, परामर्श व निर्देशन, मराठी, उर्दू, संस्‍कृत, पालि, इंग्रजी, चीनी, स्‍नेनिश, जापानी, फ्रेंच तथा डीसीए व भारतीय शास्‍त्रीय संगीत यांचा समावेश आहे. सर्टिफिकेट अभ्‍यासक्रमात मराठी, उर्दू, संस्‍कृत, चीनी, स्‍पेनिश, जापानी, फ्रेंच, अंग्रेजी, भारतीय शास्‍त्रीय संगीत (गायन) यांचा समावेश आहे. अधिक माहितीकरिता www.hindivishwa.org ही वेबसाइट तसेच टोल फ्री. नंबर 18002332141 वर संपर्क करता येईल.

वर्धा शहराच्‍या दक्षिणेकडे वर्धा बस स्‍थानक व वर्धा रेलवे स्‍थानकापासून सहा कि.मी. अंतरावर नागपूर-यवतमाळ महामार्गावर 212 एकर परिसरात असलेल्‍या या केंद्रीय विश्‍वविद्यालयात मुली आणि मुलांकरिता वेगवेगळे वसतिगृह आहेत. विश्‍वविद्यालयाचा संपूर्ण परिसर वाय-फाय युक्‍त आहे. येथे भारतातील विविध राज्‍यातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विदेशातील चीन, श्रीलंका, थायलैंड, जर्मनी, जापान, इटली, अमेरिका येथूनही विद्यार्थी अध्‍ययन-अध्‍यापनाकरिता येतात.