Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Apr 24th, 2020

  महाविकास आघाडीच्या काळात ग्रामीण भागात एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची संबंधितांनी दखल घ्यावी —– जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे

  कामठी :-,कोरोना रोगाच्या संकटाने लॉक डॉऊन संचारबंदी मुळे ग्रामीण भागात उद्भभवलेल्या परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडीच्या काळात एकही नागरिक उपाशी राहणार नाही याकरिता ग्रामपंचायतचे सरपंच, लोकप्रतिनिधी ,ग्राम विकास अधिकारी यांनी पुढाकार घेऊन दखल घेण्याचे आदेश नागपूर जिल्हा परिषद चे अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी वडोदा — बिडगाव जिल्हा परिषद सर्कलमधील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना दिले .

  कोरोना रोगाच्या संकटामुळे लॉक डाऊन, संचार बंदी मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले असून वडोदा बिडगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर कामगार वर्ग वास्तव्यास असून त्याच्यवर उपासमारीची पाळी व दयनीय अवस्था होऊ नये, त्याच्या विविध समस्यां जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद चे अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी जि प सदस्या अवंतिका ताई लेकुरवाळे, उपसभापती आशिष मललेवार, पचयत समिती सदस्य दिलीप वंजारी यांच्या उपस्थितीत बिडगाव, तरोडी,खेडी,दिघोरी,भुगाव, वडोदा ग्रामपंचायत अंतर्गत विविध वस्त्यान मध्ये कामगार, शेतमजूर ,शेतकऱयांना भेटून संचारबंदी मुळे उद्भभवलेल्य परीस्थितीची महिती घेवुन ग्रामपंचयतच्या वतीने गावातील प्रत्येक नागरिकांना मोफत मास्क, किटकनाशयक औषधाची फवारणी करावी, पाणी टाकी स्वच्छ करावी,गावातील एकही नागरिक उपाशी राहणार नांही यासाठी आपनास 14 व्या वित्त आयोग निधीतून खर्च करता येणार असून त्या करिता सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आदेश अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिले , अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे हस्ते बिडगाव परिसरातील 450 गरीब कामगारांना पालकमंत्री डॉ नितीन राऊत याचे वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू किटचे वितरण करण्यात आले ,

  जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी तरोडी, भुगाव, वडोदा,खेडी, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन पाहणी केली व कोरोना रोगा संदर्भात उपाययोजना विषयी आढावा बैठकित माहिती घेऊन कोरोना रोगा सदर्भत करावयाच्या उपाययोजना संदर्भात डॉक्टर व सहकारयांनी सदैव तत्पर राहण्याचे आदेश दिले यावेळी तहसीलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर,अमोल महल्ले, गणेश महल्ले, महेश केशरवानी, राजू बागडे, संजय काळे, राजू थोटे, किरण खराबे, विजय मेहेर,महेश केसरवानी, सतीश बर्डे, झोडगे, शिवानंद सहारे, बबलू चांभारे,जयपाल काळे, सुधाकर ठवकर आदी उपस्थित होते.

  संदीप कांबळे कामठी


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145