Published On : Fri, Apr 24th, 2020

“मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख पीपीई किट पाठवतो”

नागपूर | पीपीईबद्दल मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवर सांगितलं. ते म्हणाले मी कलेक्टरशी बोलतो. त्यानंतर मग मी स्वत: नागपूरच्या कलेक्टरना सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा फोन येईल, जरुर ती व्यवस्था करुन द्या. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या, लाख-दीड लाख पीपीई किट नागपूरहून मुंबईला पाठवायला तयार आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांशी माझा संवाद आहे, त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत. महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत, हा राजकारणाचा वेळ नाही, एकमेकाला दोष देण्याची वेळ नाही. एकमेकांना मदत करण्याची ही वेळ आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

संकटावर मात करायची आहे. भारत सरकारचं, आम्हा सर्वांचं उद्धव ठाकरे यांना सहकार्य आहे, असं गडकरींनी सांगितलं आहे.


दरम्यान, आम्ही नागपूरला एकाकडून सीएसआरमधून 1 कोटी रुपये घेतले. त्यातून आम्ही 15 हजार पीपीई किट घेतल्या आणि अनेक रुग्णालयांना त्या मोफत दिल्या, असंही गडकरींनी सांगितलं आहे.