Published On : Mon, Jun 10th, 2019

रामटेक मधून दहावीच्या परीक्षेत आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

गुणवंताचा पालकांसहित शाळेत पुष्पगुच्छ व मिठाई देऊन केल्या गौरव सत्कार .

रामटेक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल दुपारी एकला जाहीर झाला. निकाल पाहण्यासाठी शाळेत, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, नेट कॅफेमध्ये मुलामुलींनी मोठ्या प्रमाणावर पालकासोबत गर्दी केल्याचे दृश्य दिसून आले.यामध्ये

राष्ट्रीय आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले . आदर्श विद्यालय मधुन सेजल राजू रघुते 85 टक्के घेउन प्रथम येण्याचा मान पटकाविला .


द्वितीय क्रमांकाने निखिल अरविंद सावरकर 82 टक्के घेउन उत्तीर्ण झाली तर अंशुजा महाजन हिने 81 टक्के घेउन यश मिळविले तर तुषार तेलरांधे 81 टक्के टर हर्षल उईके ह्या विद्यार्थ्याने 80 टक्के घेऊन यश सम्पादन केले .

मिळालेल्या यशा बद्दल आदर्श विद्यालयाच्या प्राचार्या कमल लिखार ,उपमुख्याध्यापक पुरुषोत्तम बेले, पर्यवेक्षक राधेश्याम गायकवाड़ , जेष्ठ शिक्षक सुनिल सेलोकर ,रंगराव पाटील व स्टाफ ने पुष्पगुच्छ देउन विद्यार्थ्यांचा गौरव केला . शिक्षकांनी गुणवंत विध्यार्थी-विध्यार्थीनींचा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला तसेच गुणवंतांच्या पालकांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले.पालकांनीही मिठाई वाटून मुलांच्या निकालाचा आनंद साजरा केला.