Published On : Tue, Jul 16th, 2019

श्री दत्त मंदीर कांद्री येथे गुरू पोर्णिमे चा कार्यक्रम थाटात साजरा

कन्हान : – ग्राम पंचायत कांद्री वार्ड क्र २ येथील श्री दत्त मंदीरात पुजा अर्चना, गुरूपुजा, दहीकाल्यासह गुरू पोर्णिमेचा कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.

श्री दत्त मंदीर पंच कमेटी व्दारे मंगळवार (दि.१६) ला सकाळी श्री दत्त मंदीरात पुजा अर्चना, गुरूवर्याचे पुजन, भजन, ह भ प नथ्थुजी वझे महाराज यांचे किर्तन आणि दहीहंडी फोडुन दहीकाल्याचा प्रसाद वितरण करण्यात आला.

या गुरू पोर्णिमेच्या कार्यक्रमास परिसरातील भाविक महिला पुरूष भक्तानी चांगलीच गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्री दत्त मंदीर पंच कमेटीचे ह भ प नथ्थुजी वझे महाराज, कवडुजी आकरे, विक्रम वांढरे, पुसाराम कांबळे, हेमराज अंबाळकर, रंगराव पोटभरे, राजेश भक्ते, शेषराव आकरे, सेवक गायकवाड, महेंद्र पलिये, श्रावण मस्के, पुसाराम देशमुख, केशवराव मस्के, मारोतराव कुंभलकर, रामाजी हिवरकर, जगन निमपुरे, मधुकर खडसे, सुनिल हिवरकर, शोभा वझे, इंदिरा कुंभलकर, ज्योती हिवरकर, रूखमा गायकवाड सह ग्रामस्थानी सहकार्य केले.