Published On : Tue, Jul 16th, 2019

१२ अनधिकृत धार्मिक स्थळांवर नासुप्र’ची कारवाई

Advertisement

अनधिकृत पानठेले, चिकन शॉप व ८ टिनाचे शेड हटविले

नागपूर : जनहीत याचिका क्रमांक ८५११/२००६ मध्ये मा. उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशान्वये नासुप्र’च्या मा. सभापती व मा. अधीक्षक अभियंता (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार, दिनांक १६/०७/२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे पूर्व नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई आली.
कारवाई करण्यात आलेल्या धार्मिक स्थळांमध्ये
१) हनुमान मंदिर, सूर्य नगर, पारडी
२) पंचशिल ध्वज, जयदुर्गा नगर, भांडेवाडी
३) पंचशिल ध्वज, भोले नगर, भांडेवाडी
४) हनुमान मंदिर, हायटेंशन लाईनच्या खाली , भांडेवाडी
५) पंचशिल ध्वज, हायटेंशन लाईनच्या खाली, भांडेवाडी
६) हनुमान मंदिर, हायटेंशन लाईनच्या खाली, सदगुरु नगर, भांडेवाडी
७) हनुमान मंदिर, भांडेवाडी
८) पंचशिल ध्वज, भांडेवाडी
९) बजरंग दल सेना, समता नगर, भांडेवाडी १०) हनुमान मंदिर, समता नगर, भांडेवाडी
११) पंचशिल ध्वज, समता नगर, भांडेवाडी
१२) नाग मंदिर, अंबे नगर, भांडेवाडी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. सदर कारवाई २ जेसीबी व २ टिप्पर’च्या साह्याने करण्यात आली.

यापूर्वी मौजा भांडेवाडी स्थित हायटेंशन लाईनच्या खाली असलेले अनधिकृत पानठेले, चिकन शॉप व ८ टिनाचे शेड हटविण्यात आले. या संपूर्ण कारवाई दरम्यान नासुप्र’च्या पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता श्री. संजय चिमुरकर, विभागीय अधिकारी(पूर्व) श्री. सिध्दार्थ मानकर, कनिष्ठ अभियंता श्री. दिपक धकाते, क्षतिपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील तसेच कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. विश्वनाथ चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन फटांगळे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.