Advertisement
रामटेक: रामटेक भाजपा महिला आघाडी तर्फे भाजपा शहर अध्यक्षा तथा माजी बांधकाम सभापती नगरसेविका लता कामडे यांच्या घरी नुकतेच विशेष सदस्य नोंदणी मोहीम व आँनलाईन सदस्यता नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये सर्व वार्डातील महिला हजर होत्या.
भारतीय जनता पार्टी च्या जिल्ह्या महामंत्री रेखा दुनेदार ,जिल्हा उपाध्यक्षा अनिता दियेवार तसेच भाजपच्या जेष्ठ नेत्या नगरसेविका वनमाला चौरागडे,रामटेक शहराच्या उपाध्यक्ष समाजसेविका ज्योती कोलेपारा तसेच नगर परिषदच्या उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे , नगर परिषद च्या माजी उपाध्यक्षा नगरसेविका कविता मुलमुले ,नगरसेविका चित्रा धुरई ,पद्मा ठेंगरी, उज्वला धमगाये, अनिता टेटवार, अहिरकर मँडम व वार्डातील सर्व महिला सदस्यांनी सहभाग घेतला.
Advertisement