Published On : Tue, Aug 18th, 2020

कांग्रेस च्या पर्दाफाश आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप चे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शहर कार्यालयासमोर आंदोलन करीत विचारले ‘कहा गये 20 लाख करोड’?

कामठी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळातील लॉकडाऊन पासून बचावाकरिता 20 कोटींची पॅकेज देण्याची घोषणा केली होती त्यानंतर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20 लक्ष कोटींच्या पॅकेजचे तीन दिवस सविस्तर विवरण दिले .या पॅकेजवर युवक कांग्रेस ने प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘कहा गये 20 लाख करोड?’या जवाब दो असे विचारणा करीत राज्यभर आंदोलन पुकारले या आंदोलना अंतर्गत कामठी येथे भाजप महाराष्ट्र प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शहर कार्यालया समोर कामठी मौदा विधानसभा युवक कांग्रेस ने पर्दाफाश आंदोलन केले.या पर्दाफाश आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला.

हे आंदोलन सोशल डिस्टनसिंग राखूनच करण्यात आले यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.यावेळी प्रत्येक नागरिकाना तुम्हाला 20 लाख कोटी रुपयापैकी किती पैसे मिळाले याची विचारणा सुद्धा करण्यात आले.या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस महासचिव इरशाद शेख , महासचिव निरज लोणारे, सचिव अनुराग भोयर, कामठी मौदा विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष
फैसल नागानी,राशीद अंसारी, संदीप जैन,सुशांत यादव, कर्रार हैदर, श्रेयांस खंडेलवाल, धनेष सिरीया , मजहर हसन इरफान अहमद, अम्मार अंसारी यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते गण प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी