Published On : Tue, Aug 18th, 2020

अनंतात विलीन झालेल्या भन्ते सदानंद महास्थवीर यांना वाहली सामूहिक अश्रूपूर्ण श्रद्धांजली

कामठी :- प्रत्येक माणसाचा मृत्यू हा अटळ आहे मग तो नैसर्गिक असो वा आकस्मिक मृत्यू, प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगाचा कायमचा निरोप घेऊन अनंतात विलीन होणे आहे आणि या नोसर्गाच्या नियमाला नाकारू शकत नाही यानुसार आजाराने ग्रस्त होऊन आंबेडकरी विचारांचा वारसा सतत पुढे घेऊन चालणारे तीन आधारस्तंभ जगाचा कायमचा निरोप घेत अनंतात विलीन झाल्याने समाजात तसेच आंबेडकरी चळवळीच्या लोकांमध्ये एक शोककळा पसरली आहे

त्यामुळे अनंतात विलीन झालेले अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे अध्यक्ष संघानुशासक भन्ते सदानंद महास्थाविर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी हंसराज ढोके व भारतीय संविधान दिन गौरव समिती, सार्वजनिक भीम समूर्ती मंडळ , प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट , यासारख्या विविध आंबेडकरी संघटनेत समावेशक असलेले अशोक मंडपे यांचा काळाच्या ओघात नुकतेच दुःखद निधन झाले यांना सामूहिक आदरांजली वाजण्याच्या उद्दिष्टने आज सकाळी 10 वाजता जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शारीरिक अंतर पाळून विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने सामूहिक आदरांजली वाहण्यात आली तसेच संपन्न झालेल्या या शोकमय वातावरणात आंबेडकरी विचाराचे वाहक हरपल्याची दुःखद चिंता व्यक्त करण्यात आली.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी भारतोय बौद्ध महासभा,भारतीय संविधान गौरव समिती, सेवानिवृत्त सेवक संघ, कामठी पत्रकार संघ, सार्वजनिक भीम समूर्ती मंडळ, प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट,समता सैनिक दल, हरदास युवा मंडळ, फुले आंबेडकरी विचारधारा, डॉ बाबासाहेब आंबेडकर समिती, लिबर्टी क्लासेस, निश्चय सामाजिक संघटना तसेच महिला मंडळ च्या वतीने सामूहिक अभिवादन वाहण्यात आले .याप्रसंगी कु. रविना अशोक मंडपे, सुगत रामटेके, राजेश गजभिये, नागसेन गजभिये, प्रदीप फुलझेले, अर्चनाताई सोमकुवर, विद्याताई भीमटे, नंदाताई गजभिये, बाबुराव रामटेके, अनिल पाटील, निलेश मेश्राम, कोमल लेंढारे, प्रमोद खोब्रागडे, मनोहर गणवीर,नामदेव फकिरडे, दिपंकर गणवीर, भीमराव नंदेश्वर, दुर्योधन मेश्राम, वासू मेंढे, बबलू रामटेके, विनोद बन्सोड, अरुण शेलारे, नरेश ढोके, विजय मांनवटकर, सुनील गडपायले, महेंद्र कापसे, कृष्णा पटेल आदी प्रामुख्याने उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी
.

Advertisement
Advertisement