कामठी :-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे तेव्हा कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड 19 या आजारावर नियंत्रण व प्रसार रोखण्यासाठी तालुका प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार कलम 144 अनव्ये सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमास बंदी घातली आहे यानुसार आज असलेल्या पोळ्याच्या पर्वावर पोळ्याला बैल आणणाऱ्यांनी स्वतःच्या तसेच बैलाच्या तोंडालाही मुखपट्ट्या लावाव्या व बैलाची पूजा करताना व्यक्तिकरित्या मुखपट्टी सॅनिटायझर चा वापर करावा आणि सामाजिक अंतराच्या नियमांच पालन करीत बैल पोळा व तान्हा पोळा साध्या पद्धतीने साजरा करावा मात्र सार्वजनिक रित्या बैल पोळा व तान्हा पोळा साजरा करू नये असे आव्हान कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात 13 ऑगस्ट ला गृह शाखेचे मार्गदर्शक सुचनापत्र प्रसिद्ध केले आहे यानुसार कामठी तालुक्यात मोठा पोळा व तान्हा पोळा व इतर सन साध्या पद्धतीनेच साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.
पोळ्याबाबत मार्गदर्शक सूचना:/
@कामठी तालुक्यात मोठा पोळा व तान्हा पोळा हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध
@पोळा हा सण साजरा करताना बैलाची पूजा वा अन्य धार्मिक कार्यक्रम घरीच साजरे करावे
@सांस्कृतिक कार्यक्रमा ऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे उदा.रक्तदान , उपक्रम आयोजित करण्यास प्राधान्य घ्यावे आणि प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वछता याबाबत जनजागृती करावी,
@बैलाच्या मिरवणुका काढू नयेत
@आरती, पूजा वा अन्य धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी , ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदीचे पालन करावे.
संदीप कांबळे कामठी
