
नागपूर -शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पला विद्यार्थी आणि पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सर्जनशील विकासावर विशेष भर दिला जात आहे.
या समर कॅम्पमध्ये ४ ते ७ वर्षे आणि ८ ते १४ वर्षे वयोगटातील एकूण १३३ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुलांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी विविध मैदानी आणि अंतर्गत उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
आज टर्फ मैदानावर अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट, पिकलबॉल आणि डॉजबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी उत्साहाने सहभाग घेत विविध खेळांचा आनंद लुटला.
खेळांसोबतच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सर्जनशील क्षमतांचा विकास व्हावा यासाठीही अनेक उपक्रम राबवले जात आहेत. शिस्त, सहकार्याची भावना आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यावर कॅम्पमध्ये विशेष लक्ष दिले जात आहे.
नागपूर पोलिसांचा हा अभिनव उपक्रम मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरक्षित, आनंददायी आणि कौशल्यविकासासाठी उपयुक्त ठरत असून, पालकांकडूनही या कॅम्पचे कौतुक केले जात आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY




