
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाद्वारा प्राप्त विशेष अनुदाना अंतर्गत प्रभाग क्र. १२ अमरावती रोड ते आंतरराष्ट्रीय कृषी कन्वेंशन सेंटर वायुसेना गेट ते दाभा रिंग रोड पर्यंत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात खासदार श्रीमती मायाताई ईवनाते, आमदार श्री. विकास ठाकरे, आमदार डॉ. परिणय फुके, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, विरोधीपक्ष नेते श्री. संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, प्र.अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, एआयएमआयएमचे गट नेते श्री.शकील पटेल, मुस्लीन लीगचे गट नेते श्री. असलम मुल्ला खान, माजी आमदार श्री. सुधाकर कोहळे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शना धवड, धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती सभापती श्रीमती रुतिका मसराम, नगरसेविका श्रीमती साधना बरडे, नगरसेवक श्री. विक्रम ग्वालबंसी, नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, नगरसेविका योगिता तेलंग, नगरसेविका श्रीमती फुलसु़गे, नगरसेवक श्री योगेश पाचपोर, नगरसेवक श्री. अभिजीत झा, नगरसेवक श्री.केतन ठाकरे, श्री. विजय होले, श्रीमती वर्षा चौधरी, माजी उपमहापौर श्री संदीप जाधव, मनपाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गदरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार श्रीमती मायाताई ईवनाते म्हणाले की, दाभा परिसरातील नागरिकांची हा सिमेंटचा रस्ता करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. हा सिमेंट रस्ता मंजूर झाल्याने नागरिकांची मागणी पूर्ण होत असल्याचा मला आनंद होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शना धवड यांनी केले. यावेळी त्यांनी अमरावती रोड ते आंतरराष्ट्रीय कृषी कन्वेंशन सेंटर वायुसेना गेट पर्यंत ७३० मी लांबीत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी १ .५० मी रुंदीत फुटपाथ व पावसाळी नालीचे काम अंतर्भूत असून, एकूण १८ मी रुंद रस्ता सिमेंटीकरण करणेकरिता प्रस्तावित असल्याचे सांगितले. प्रकल्पाकरिता ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मनोगत व्यक्त करीत सांगितले की, हा रस्ता स्मार्ट रोड म्हणून विकसित होणार आहे. येथे आंतरराष्ट्रीय कृषी कन्वेंशन सेंटर उभारण्यात येत असून, देश विदेशातून लोक येतात, त्यासाठी ये-जा करण्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रिचा सुगंध यांनी केले तर आभार नगरसेवक श्री. विक्रम ग्वालबंसी यांनी मानले.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





