Published On : Wed, Dec 17th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘ऑन द स्पॉट पेंटिंग’ स्पर्धेत देशभरातील १७० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

सदानंद कृ. बाकरे स्मृतीनिमित्त आयोजन
Advertisement

नागपूर, : बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे संस्थापक सदस्य आणि आधुनिक भारतीय कलेचे महत्त्वपूर्ण स्तंभ असलेले सदानंद कृ. बाकरे यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘ऑन द स्पॉट पेंटिंग’ स्पर्धेला देशभरातील कला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागपूरसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, हिंगणघाट, पुसद, वर्धा, नवरगाव तसेच कर्नाटकातील एकूण १७० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

बुधवारी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध कला इतिहासकार, लेखक व एलोरा लेण्यांचे अभ्यासक प्रा. दीपक कन्नाल, एस. के. बाकरे मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लिंबेकर, सचिव डॉ. सदानंद चौधरी, दिपाली लिंबेकर, सुरेश व्यवहारे आणि वैशाली व्यवहारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी ४ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर आपल्या कलात्मक कल्पनांना मूर्त स्वरूप दिले.

Gold Rate
06 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,52,500 /-
Gold 22 KT ₹ 1,41,800 /-
Silver/Kg ₹ 2,42 300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुरुवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रा. दीपक कन्नाल यांचे व्याख्यान होणार असून त्यानंतर ज्येष्ठ भित्तीशिल्पकार अशोक सोनकुसरे यांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि ११ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून पाच उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी २ हजार रुपयांची असतील. याशिवाय एका उत्कृष्ट कलाकाराला विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement