Published On : Wed, Dec 17th, 2025
By Nagpur Today Nagpur News

पृथ्वीराज चव्हाण म्हणजे ‘महाभविष्यवक्ता’; महसूल मंत्री बावनकुळे यांचा उपरोधिक टोला

Advertisement

अमरावती : माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबर रोजी देशाच्या राजकारणात मोठा उलथापालथ होणार असल्याचा दावा करत पंतप्रधान बदलतील आणि मराठी व्यक्ती पंतप्रधान होईल, असे विधान केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “पृथ्वीराज चव्हाण हे आता जगातील सर्वात मोठे भविष्यवक्ता झाले आहेत,” असा खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला.

अमरावतीत माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांचे भान काहीसे हरपल्यासारखे वाटते. काहीही आणि कधीही बोलण्याची त्यांना सवय लागली आहे. कोण पंतप्रधान होणार, कोण जाणार, कोण येणार—अशा काल्पनिक गोष्टींमध्ये ते रमले आहेत. त्यामुळे ते स्वतःलाच आता जगातील सर्वात मोठे भविष्यवक्ता समजत असावेत,” असा उपहासात्मक हल्ला त्यांनी केला.

Gold Rate
04 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,60,300 /-
Gold 22 KT ₹ 1,49,100 /-
Silver/Kg ₹ 2,87 100 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नगरपालिका निवडणुका महायुतीतूनच-
नगरपालिका निवडणुकांबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. “या निवडणुका भाजप महायुती म्हणून एकत्रितपणे लढवल्या जातील. २९ नगरपालिकांमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवत दोन-तृतीयांश बहुमताने विजय मिळवू, असा आम्हाला ठाम विश्वास आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “प्रत्येक नगरपालिकेसाठी महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यासंदर्भात बैठक घेतली असून तयारीला वेग आला आहे,” असे बावनकुळे यांनी सांगितले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement