Published On : Fri, Jul 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कळमना परिसरात भरधाव एसटी बसची धडक; दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू

Advertisement

नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी रोडवरील न्यू ओम साई नगर परिसरात भरधाव एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर बसचालकाने बस कळमना डेपोमध्ये नेऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मृत शिक्षकाची ओळख निलेश मुरलीधर पारधी (वय ४१, रा. येरखेडा, कामठी) अशी झाली आहे. ते यशोधरा नगर येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश पारधी हे शुक्रवारी सकाळी दुचाकीने शाळेकडे जात असताना कामठी रोडवरील न्यू ओम साई नगर येथील गतिरोधकाजवळ भरधाव एसटी बसचे नियंत्रण सुटले. बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते बसच्या चाकाखाली आले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अपघातानंतर बसचालकाने वाहन कळमना डेपोमध्ये नेऊन घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी कळमना पोलीस पुढील तपास करीत असून, प्राथमिक तपासात गतिरोधकाजवळ बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Advertisement
नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident #Teacher #newsupdate

नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident...

जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion #MaharashtraNews #news

जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion...

अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews

अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews

स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate...

घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra #nnew

घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra...

अंबादास दानवे का BJP पर बड़ा हमला #BJP #MaharashtraPolitics #Gondia #NavneetRana  #MaharashtraNews

अंबादास दानवे का BJP पर बड़ा हमला #BJP #MaharashtraPolitics #Gondia #NavneetRana #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges