Published On : Mon, Apr 23rd, 2018

डीपी रोडच्या कामांना गती द्या

Advertisement

Pravin Datke

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे प्रस्तावित असलेल्या डीपी रोडच्या कामांना गती देण्याचे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले. सोमवार (ता.२३) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत आयोजित बैठकीत त्यांनी निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.

महाल येथील केळीबाग रोड, जुना भंडारा रोड, मॉडेल मिल ते राम कुलर चौक या रस्त्यांच्या प्रस्तावित रुंदीकरणाच्या कामाचा आढावा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. सर्वोच्च न्यायालयच्या निकालानंतर केळीबाग रस्त्याच्या रूंदीकरणाबाबत महानगरपालिकेने केलेल्या कार्यवाहीचा आढावाही त्यांनी घेतला. रस्ता विकासाच्या मार्गातील अडथळे तातडीने दूर करून प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तेथील अतिक्रमण हटवावे, स्थानिक नागरिकांच्या समन्वयाने कार्यवाही करण्यात यावी, असे देखिल सूचित केले.

बैठकीला अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामन्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, अभियोक्ता व्यंकटेश कपले, आर.एस.भूतकर, विजय हुमने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.