Published On : Wed, Jun 5th, 2019

सट्टा व्यवसायातील कामठी च्या अज्जू, मनोज नंतर हाजीच्या नावाची उचल

कामठी: नुकतेच संपलेल्या आयपीएल क्रिकेट मॅच वर सट्टेबाजांची मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच काही दिवसापूर्वीच सुरू झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेट मॅच वर सट्टेबाजांची आर्थिक उधळण सुरू झाली आहे.नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरात राजकीय आश्रयाने कित्येक व्यावसायिक हे अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणात मलिदा लाटत आहेत त्यात कामठीत सट्टेबाज माफियांची सुद्धा चांगलीच रंगत लढली असून या सट्टेबाज माफियात कामठीतील अज्जू व मनोज नावाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आहे मात्र दोन दिवसांपूर्वी एका हाजी नामक सट्टा व्यावसायिक वर धाड घालून त्याच्याशी 10 लक्ष रुपयात तोंडी केल्याची चर्चा जोमात आहे तर हा सट्टा माफिया कामठी सह उत्तर नागपुरातील सर्वात मोठा क्रिकेट सट्टाबाज मानल्या जातो तेव्हा कामठी तील क्रिकेट सट्टा माफियातील अज्जू,मनोज नंतर हाजीच्या नावाची प्रसिद्धी झाल्याने कामठी तील हा ‘हाजी’ कोण? याची चर्चा पोलीस विभागासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

नाव न सांगण्याचा अटीवर मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी सायंकाळी साडे चार दरम्यान गुन्हे शाखेतील ‘पापा’ याने कामठी तील क्रिकेट सट्टेबाज हाजी याला ताब्यात घेऊन त्याला वरिष्ठांचे अभय सांगून वर्ल्ड कप च्या अन्य स्पर्धेवर अभयपणे क्रिकेट सट्टा खेळण्यासाठी लाखो रुपयांची सौदेबाजी करीत मोठ्या प्रमाणात तोंडी करून सेटलमेंट केल्याची माहिती आहे.तेव्हा हा हाजी नामक क्रिकेट सट्टेबाज कामठी साठी नवीन नाव असून क्रिकेट सट्टा माफियात अज्जू, मनोज शिवाय अजून कोणाचे नाव ऐकिवात येत नाही तसेच या अज्जू व मनोज ला सत्ताधारी नेत्यांचे पाठबळ असल्याने पोलीस विभाग सुद्धा डोळे मिटून बसले असून कारवाहिस्तव धजावतात तर राजकोय पाठबळामुळे या सट्टा माफियांना पोलिसांची कुठलीही भीती राहिलेली नाही .तेव्हा कामठीतील हा ‘हाजी ‘कोण हे अजुनही अनुत्तरित आहे तर हा हाजी नागपूर चा असल्याचे सांगण्यात येत असून याचे कामठीत क्रिकेट सट्टा चे मोठे रॅकेट असल्याचे सांगण्यात येते.मात्र पोलीस विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते…

– संदीप कांबळे कामठी