Published On : Sat, Sep 7th, 2019

मुम्बईत बसपाची विशेष बैठक संपन्न

Advertisement

मुम्बई: काल बसपाच्या महारास्ट्र प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा पदाधीकार्यांची विशेष बैठक दादर (मुंबई) च्या नायगावातील श्रीकृष्ण मंदिर सभागृहात संपन्न झाली.

प्रदेश कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीला केन्द्रीय महासचिव व महारास्ट्र प्रदेशचे प्रभारी रामअचलजी राजभर साहेब, केन्द्रीय महासचिव राज्यसभा खासदार व महारास्ट्र प्रदेशचे प्रभारी डॉ अशोकजी सिद्धार्थ साहेब, प्रदेश अध्यक्ष सुरेशजी साखरे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले साहेब, प्रदेश कोषाध्यक्ष दयानंदजी कीरतकर साहेब ह्यांनी प्रामुख्याने उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.

Gold Rate
17 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900/-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 2,01,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बहुजन समाजाशी गठबंधन करा : राजभर साहेब
अल्पसंख्यान्काचे नेतृत्व करणारे भाजपा-कांग्रेसवाले बहुजन समाजाचे नेतृत्व करणार्या बसपा ला युती चे प्रस्ताव पाठवितात. याचे कारण आमच्या बहुजन समाजाचे लोकचं मनुवाध्यांच्या गोठात जाऊन “कुर्हाडीचा दान्डा गोतास काळ” ठरत आहेत. म्हनूण महापुरुशांच्या चळवळी ला माननार्यान्नी असे होउ देऊ नका असा सल्ला दिला. कांग्रेस ने बाबासाहेबांशी धोकेबाजी केली, रिपब्लिकन ला संपविले, मोदी हा खोटारडा असून त्यांनी दलित- आदिवासी- OBC ला फसवीले, देशाला मुर्ख बनविले, सविधानाला धोका दिला असे वक्तव्य केले. प्रकाश आम्बेडकर ह्यानाच युती नको असल्याने आमचे कडून अनेकदा प्रयत्न करूनही ते स्वत:च टाळतात असा उल्लेख या प्रसंगी केला.

बसपा सविधान पर अंमल चाहती : डॉ सिद्धार्थ
बसपा और अन्य पार्टियो में यह अंतर है की अन्य पार्टिया सविधान विरोधी होते हुए भी वह उसे लागु करनेका ढोंग करते. सिर्फ बसपा ही सविधान को सही मायनेमे अमल करनेवाली पार्टी है. हमारे मसिहाने कांग्रेस- भाजपा को सापनाथ-नागनाथ की उपमा दी थी वह आज भी बरकरार है. ये दोनों पार्टिया आरक्षण विरोधी है.

बसपा ची फसल ख़राब करण्याचे कार्य कुणी करू नये : साखरे
शेतकरी ज्या पद्दतिने शेतीची मशागत करून पीक काढण्याच्या तयारीत असतो त्याचवेळी उपद्रवी नासधुस करतात. त्याच प्रकारे भाजपा ने आपली वंचितची बी टीम पुढे करुन बहुजाचे नुकसान करन्याचे तंत्र वापरित आहे त्यापासून सावध राहन्याचे व महारास्ट्रात 25-30 जागा जिंकुन *बैलेंस ऑफ़ पावर* बनण्याचे आवाहन केले.

या विशेष बैठकीला महारास्ट्रातील झोन को-ऑर्डिनेटर, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव, प्रदेश सदस्य, जिल्हा को-ऑर्डिनेटर, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कमेटी, शहराध्यक्ष, शहर कमेटी, विधानसभा प्रभारी व विधानसभा अध्यक्ष आदी बसपा, बीव्हीएफ, बामसेफ, भाईचारा च्या पदाधिकार्याची उपस्थिती होती.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement