Published On : Mon, Nov 19th, 2018

लघु उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष मोहीम

Advertisement

नागपूर: सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी उद्या मंगळवार दि.20 नोव्हेंबर रोजी जिल्हा उद्योग केंद्रात विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. जिल्ह्यात 26 विशेष कॅम्पचे आयोजन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना दिलेल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमानुसार या कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.

तालुकास्तरावरील औद्योगिक वसाहतीतील असंघटीत क्षेत्रातील कामगाराच्या योजना पोहोचवणे, उद्योजकासाठी असणाऱ्या विविध अडीअडचणी, त्यांच्या समस्या नोंदणी, फूड व प्रक्रिया उद्योगातील घटकासाठी असणाऱ्या योजना, सवलतीची माहिती देण्यात येईल. जिल्हा अग्रणी बॅंक व उद्योजकांसाठी ह्या कॅम्पचे आयोजन आहे.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज बैठकीत कॅम्प आयोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. बारापात्रे, डिक्कीचे निश्चय शेळके, अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त श.रा.केकरे उपस्थित होते.

तरी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.