अवैद्य दारु विरुद्ध विशेष मोहीम 4,28,389/- चा मुद्देमाल जप्त
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागपूर शहर व ग्रामीण भागात अवैद्य मद्य निर्मिती व विक्री अशा 40 ठिकाणी कारवाई करून रुपये 4 लाख 28 हजार 389 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
√ सदरची विशेष मोहीम अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार व उपअधीक्षक ज्ञानेश्वरी अहेर यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात आली. या वेळी 684 लिटर हातभट्टी दारू, 16 हजार लिटर रसायन / सडवा, 106 लिटर देशी दारु जप्त करण्यात आली असून, 29 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

या मध्ये *पाचपावली* पोलीस स्टेशन हद्दीतील धनवंती उमेश निमजे, मीना हुकमत निमजे, मंतीलाल कांतीलाल गौर, हेमंत भगवतीराम जगत, नरेश सुरेश यादव, शोभा मधूजी धार्मिक, *जरीपटका* पोलीस स्टेशन हद्दीतील संकेत तुकाराम चहांडे, *कपिलनगर* पोलीस स्टेशन हद्दीतील महेंद्र महादेव खंडारे, *अजनी* पोलिस स्टेशन हद्दीतील सरस्वती बहद्दीर यादव, व सुकेशीनी राजेश बल्लारे तसेच *कळमना* पोलीस स्टेशन हद्दीतील सचिन महादेव टिळके, माया सुकलदास गेंद्रे, विजय मोरेश्वर बोरकर, लता प्रवीण गेडाम इत्यादींना तसेच अन्य 15 आरोपींना अटक करून कारवाई करण्यात आली.
या कारवाई मध्ये निरीक्षक केशव चौधरी, रावसाहेब कोरे, सुभाष खरे, मुरलीधर कोडापे, बाळासाहेब पाटील यांच्या अंतर्गत स्टाफ व दोन भरारी पथके इत्यादी नी ही विशेष मोहोम राबविली.