Advertisement
fnag
नागपुर – ला भारतीय स्वातंत्र्य दिनाचे वर्धापनदिना निमित्त सकाळी ९.०० मा. विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हील लाईन, नागपूर येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
त्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही मा. स्वातंत्र संग्राम सैनिकांना विनामुल्य श्हर बस सुविधा परिवहन विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर द्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सदर बस मोरभवन, सिताबर्डी येथुन सकाळी ०८.१५ सुटेल व विभागीय आयुक्त कार्यालय येथुन १०.०५ वा. परत येईल तरी मा. स्वातंत्र संग्राम सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे मनपा परिवहन विभागातर्फे कळविण्यात आले आहे.