Published On : Fri, Aug 14th, 2020

गट ग्रामपंचायत हिवरा बाजार येथे झिंक फॉक्स ची धूर फवारणी

-हिवरा बाजार सरपंच गणेश चौधरी यांचा पुढाकार..

f

रामटेेक: सद्ध्या संपूर्ण जगात सर्वत्र कोरोना चे थैमान सुरू आहे. महाभयंकर महामारी मधे निरोगी , शरीर सुदृढ राहणे खूप गरजचे आहे. एकीकडे पावसाळा असल्याने मलेरिया, डेंग्यू, यासारख्या रोगांची भीती आहे.

अापल्या गावात कोनत्या हि रोगांचा प्रादुर्भाव पसरु नये याकरीता हिवरा बाजार सरपंच गणेश चौधरी यांनी त्वरीत या गंभिर बाबींची दखल घेतली. कोनी कोणत्या आजराला बळी पडू नये याकरीता त्याचे जीविताच्या दृष्टिने ग्रामपंचायत हिवरा बाजार येथे नुकतेच संपूर्ण गावात डेंगू डासांच्या प्रादुर्भाव रोखण्याकरिता झिंक फॉक्स ची धूर फवारणी करण्यात आली.

हिवरा बाजार चे सरपंच गणेश चौधरी, सचिव महादेव फिरंगवार ,उपसरपंच अर्चणा मडावी , सदस्य राजेन्द्र बागडे, रामकृष्ण टेटे, आदी ग्राम वासियाणी या उपक्रमात सहकाऱ्य केले.