Published On : Mon, May 24th, 2021

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरतर्फे बुद्ध जयंतीनिमित्त 26 मे रोजी “अत्त दीप भव” संगीत कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर : केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अधीन कार्यरत नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र्- एस.सी.जेड.सी.सी. द्वारे “बुद्ध जयंती” निमित्त 26 मे रोजी सकाळी 11 वाजता “अत्त दीप भव” या संगीत कार्यक्रमाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम या केंद्राच्या https://www.youtube.com/user/sczcc या यूट्यूब वाहिनीवर थेट प्रसारित होणार असून या सुमधुर संगीताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित हिंदी, मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये सारेगामापा स्पर्धा विजेती, पार्श्वगायिका श्रीमती आकांक्षा नगरकर देशमुख आणि सारेगामापा फेम पार्श्व गायक पियुष वाघमारे आपली गाणी सादर करतील. या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होण्याच आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरतर्फे करण्यात आले आहे,