Published On : Thu, Sep 21st, 2023
By Nagpur Today Nagpur News

ऑनलाईन फसवणूक प्रकरणातील आरोपी सोंटू जैनचा पासपोर्ट नागपूर पोलिसांकडून जप्त !

Advertisement

नागपूर : शहरातील तांदूळ व्यावसायिक विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटी रुपयांची फसवणूक करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याच्यावर पोलीस हळूहळू पकड घट्ट करत आहेत. आता तो परदेशात धावू शकणार नाही. बुधवारी पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला. तसेच आरोपी सोंटू जैनची बुधवारी गिट्टीखदान येथील गुन्हे शाखेकडून 8 तास चौकशी करण्यात आली.

डायमंड एक्सचेंज नावाच्या गेमिंग ऍप्लिकेशनचा आयडी वापरून क्रिकेट बुकी सोंटू जैन याने विक्रांत अग्रवालची ५८ कोटी रुपयांची फसवणूक केली. दोन वर्षांच्या प्राप्तिकर नोंदींमध्ये सोंटूचे उत्पन्न 16.15 लाख रुपये असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे, तर तो कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. पोलिसांचे एक पथक आणि फॉरेन्सिक ऑडिट टीम त्याच्या 12 हून अधिक शेल कंपन्यांच्या खात्यांची चौकशी करत आहेत. गोंदियातील संजय अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून सोटू जैन याने नुकताच जमीन खरेदीसाठी 30 कोटींचा व्यवहार केल्याची चर्चा आहे. संजय, सोंटूची बहीण आस्था जैन, तिची मैत्रिण रुबी जैन आणि विनय जैन यांना बुधवारी नागपुरात निवेदन देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न –
सोनटू जैन आता साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांना २-३ साक्षीदार सापडल्याची चर्चा आहे. याचा वारा सोंटूला लागताच त्याने साक्षीदारांना धमक्या देण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील पीडित विक्रांत अग्रवाल आणि साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठोस पावले उचलत असून, सोंटूवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.