Published On : Sat, Apr 11th, 2020

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत आहेत काही व्यापारी आणि दुकानदार

रामटेक: संपूर्ण देशात कोरोनाची दहशत पसरली आहे. संपूर्ण देश हा कोरोनामुळे त्रस्त झाला आहे. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे.

अशा परिस्थितीत मजुरी करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र लॉक डाऊनचा गैरफायदा व्यापारी व दुकानदार घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रोजच्या आहारात असणाऱ्या अन्न धान्याची किंमत प्रती किलो ५ ते ३० रुपयांनी वाढली आहे .त्यामुळे सामान्य माणसाच्या खिश्याला कात्री लागली आहे. कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी सरकार प्रशासन जीवाची पर्वा न करता प्रयत्न करीत आहे. मात्र काही व्यापारी काळाबाजार करत आहे. जनतेला लुटत आहे.

संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवता पडू नये म्हणून औषध , किराणा दुकान,भाजीपाला, अन्नधान्य दुकान सुरू ठेवले आहेत. परंतु काही व्यापारी याचा गैरफायदा घेत आहेत . धान्याचा किराणा मालाचा काळाबाजार करत आहेत. तसेच ग्राहकांना चढ्या भावाने वस्तू विकत असुन रामटेकमध्येच तेल साखर दिडपट भावाने विकला जात असल्याचा आरोपही अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेकचे कार्याध्यक्ष राकेश मर्जीवे व उपाध्यक्ष अविनाश शेंडे, शेषराव बांते व समाज सेवक राजेश टाकळे यांनी केले आहे .

त्यांनी काळाबाजार करणारे दुकानदार यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संकटाच्या परिस्थितीत लोकांची मदत करण्याऐवजी काही दुकानदार काळाबाजार करत आहे. यावर सक्त कारवाई केली पाहिजे असे अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीची मागणी आहे.