Published On : Sat, Apr 11th, 2020

आपत्काळ सामाजिक संघटना व्दारे सामाजिक सेवाकार्य व रक्तदान

कन्हान : – कोरोना विषाणुच्या प्रादुभा वाने निर्माण आपात्काळीन परिस्थितवर मात करण्याकरिता आपत्काळ सामाजि क संघटना कन्हान कांद्री व्दारे गरजुना मास्क, दुध, बिस्कीट, जेवन, अन्नधान्य सेवा भावी वितरण करित २८ रक्तदात्यां नी रक्तदान केले.

आपत्काळ सामाजिक संघटना कन्हान कांद्री व्दारे मागील दि २५ मार्च पासुन कन्हान परिसरात स्वत: हजार मास्क तयार करून वाटप, गरीब वस्तीत लहान मुलांना दुध,बिस्किट वाटप, गरजु व्यक्तींना किराणा किट,अन्न धान्य वाटप, दररोज बँकेत दोन स्वयंसेवक ठेऊन सोशल डिस्टन्स व गर्दी होऊ नये करिता सेवा, परिसरातील गावात कोरोना महा मारी विषयी जनजागृती, पोलीस तथा प्रशासनाच्या सुचनाचे पालन करून वेळोवेळी सहकार्य करित अनेक गरजु व्यक्तींना सेवा, मदत कार्य सतत सुरू आहे. शुक्रवार (दि.१०) ला राष्ट्रीय महा मार्ग कांद्री येथे लाईफ लाईन रक्तपेढी नागपुर च्या सहकार्याने रक्तदान शिबीरा चे आयोजन करण्यात आले यात संघटने चे अध्यक्ष प्रमोद वानखेडे, निलेश गाढवे, अशोक बनकर, सिल्वेस्टर फर्नांडिस, पराग सपाटे, कैलास भिवगडे ,कामरान जाफरी, विनोद कोहळे, श्याम मस्के, चेतन भिवगडे, शुभम चहांदे, रितेश जनबंधू ,रोशन सोनटक्के, राॅनी वानखेडे, पवन माने, अजय गायकवाड, प्रविण हुड, प्रमोद शर्मा, प्रफुल बावनकुळे, सुरेश वंजारी, विकी पडोळे, अविनाश इंगळे, सुरज मिश्रा, गौरव माहातो, रितेश हावरे, नरेंद्र कश्यप, शिवचरण गुप्ता आदी २८ रक्तदात्यांनी रक्तदान करून विविध माध्यमातुन सेवाकार्य करित आहे. रक्तदान कार्यक्रमास नेहरू युवा केंद्र नागपूर, युवा चेतना मंच राजे ग्रुप कन्हान, कन्हान शहर विकास मंच आदी च्या कार्यकत्यांनी सहकार्य केले. शिबीरा स कांद्री सरपंच बलवंत पडोळे,उपसरपं च श्यामकुमार बर्वे यांनी भेट दिली.