Advertisement
नागपूर:सोमलवार अकादमी एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आणि सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश ॲड. मधुकरराव सोमलवार यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. ते 95 वर्षाचे होते.
आज शनिवार 28 डिसेंबर रोजी त्यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी पहाटे 4:45 वाजता सोमलवार यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोमलवार निकालस महाराज देवस्थानचे देखील अध्यक्षही होते.त्यांचा पश्चात मुलगा महेश सोमलवार, मुलगी, सून, नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने नातेवाईक आणि मित्र परिवारासह सर्व स्तरावरून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांची अंत्ययात्रा रविवार, 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंबाझरी घाट येथे निघेल.