Published On : Sat, Jan 22nd, 2022

२७ तारखेपर्यंत दिव्यांगाचा समस्या सोडवा– राज्यमंत्री बच्चू कडू.

Advertisement

दिव्यांगांच्या आंदोलनाला दिली भेट.

मागील ८ दिवसापासून आपल्या हक्काच्या मागणीकरिता आंदोलन करीत असलेल्या दिव्यागांना येत्या २७ जानेवारीला बैठक घेऊन त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मनपा प्रशासनला दिले.

मागील ८ दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर व प्रहार अपंग क्रांती मोर्चा तर्फे दिव्यांगांच्या हक्काच्या मागणीकरिता ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या ठिय्या आंदोलनाला आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली.

मागील ८ दिवसापासून भर थंडीत हे दिव्यांग बांधव व प्रहार चे शहर अध्यक्ष राजू बोढारे हे आंदोलन करीत आहे पण अजूनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही हे दुर्दैव असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त यांनी २४ तारखेला बैठक लावून मी स्वतः दिव्यांगाच्या समस्या मार्गी लावणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख रूपाने प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर अध्यक्ष राजेश बोढारे, कार्याध्यक्ष शबिना शेख.दिव्यांग शहर अध्यक्ष ऊमेश गणविर. सचिव धरम पडवार. ज्योती बोरकर.संजय पांडे.सुनिल ठाकुर.रिजवान शेख.हारुन खान. मोहम्मद इरफान. अब्दुल सलाम.मोहम्मद ईसराईल.संजय शाहु. चंद्रिका राय यादव.नेहाजभाई ईसाद भाई व मोठ्या संख्येने प्रहार सेवक उपस्थित होते.