Published On : Tue, Jun 5th, 2018

नागपूर मेट्रो स्थानकांवर सौर उर्जा प्रकल्पाला सुरवात

Advertisement

नागपूर : महा मेट्रो नागपूर अंतर्गत येणाऱ्या सर्व मेट्रो स्थानकावर सौर उर्जेचा वापर होणार असून या माध्यमाने महा मेट्रो दरवर्षी १४ मेगा वाट विजेचे निर्मिती करून तब्बल १२ कोटी रुपये वाचविणार असल्याचे महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले . या महत्वाकांशी प्रकल्पाला आज एयरपोर्ट(साउथ) स्टेशन येथून सुरवात झाली असून पहिल्या टप्यात महा मेट्रोच्या एयरपोर्ट(साउथ), न्यू एयरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्थानकांवर सोलर पैनल बसविणार असल्याचे देखील डॉ. दीक्षित म्हणाले.

एयरपोर्ट(साउथ) स्टेशन वर सौर उर्जेचे पहिले पैनल आज बसविण्यात आले त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सौर उर्जेचे पहिले पैनल बसविण्यासोबतच महा मेट्रोच्या तीन स्टेशनची (IGBC – Indian Green Building Council) इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल तर्फे प्लॅटिनम रेटिंग सर्टिफिकेट करता निवड करण्यात आली. आयजीबीसी तर्फे या निमित्याने प्रशस्तीपत्र तसेच मानचिन्ह आयजीबीसी विदर्भ चाप्टर चे प्रमुख श्री. अशोक मोखा डॉ.दीक्षित यांना प्रदान केले. उद्या साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या तिन्ही स्टेशन वर मिळून एकूण ९६२ सोलर पैनल बसविण्यात येणार असून हे काम सुमारे एका महिन्यात पूर्ण होणार आहे. सरकारच्या मेक इंन इंडिया योजनेअंतर्गत हे पैनल बसविल्या जाणार आहे. पारंपारिक पद्धतीने मिळणाऱ्या विजेची किमत प्रती युनिट ९.६७ आहे या उलट सौर उर्जेचा वापर केल्यास रु. ३.५८ प्रती युनिट किमतीने वीज महा मेट्रो ला मिळणार आहे हिशोब केल्यास महा मेट्रो ची सौर उर्जेचा वापर केल्याने रुपये ६.०९ प्रती युनिट बचत होणार आहे. पहिल्या टप्यात जरी एयरपोर्ट(साउथ), न्यू एयरपोर्ट आणि खापरी स्टेशनवर सौर उर्जेचे सयंत्र बसविले जाणार असले तरीही येत्या काळात महा मेट्रोच्या स्टेशनस, सर्व स्टेशन्स आणि इतर कार्यालयावर हे सयंत्र बसविले जाणार आहे. औष्णिक वीज केंद्रातून किंवा इतर पारंपारिक माध्यमातून निर्मित झालेल्या विजेमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका जाणवतो, म्हणूनच पर्यावरण संरक्षणाचे घ्येय असलेल्या महा मेट्रो ने सौर उर्जेच्या वापरावर निर्माण कार्यापासूनच भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एयरपोर्ट(साउथ), न्यू एयरपोर्ट आणि खापरी तीन स्टेशन करता आयजीबीसी चे मानाकन मिळाले असतांना येत्या काळात महा मेट्रोच्या इतर सर्व स्टेशन करता देखील प्लॅटिनम सर्टिफिकेट मिळवण्याची तैयारी सुरु केली आहे. या पर्यावरणपूरक व्यवस्था स्टेशन वर केल्याने हे मानांकन नागपूर मेट्रोच्या स्टेशनला मिळाले आहे. या अंतर्गत येणाऱ्या विविध श्रेणी मध्ये एकूण ७९ गुण महा मेट्रो ला मिळाले असून पुढच्या काळात हे गुण वाढावे या करता महा मेट्रो प्रयत्न करणार असल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले. महा मेट्रो तर्फे हिंगणा येथील वासुदेव नगर भागात लिटील वूड ची स्थापना २ वर्षापूर्वी करण्यात आली आहे. येत्या काळात त्याभागातील १०० एकर जमीन मिळविण्याचा प्रयत्न महा मेट्रो करीत असून या ठिकाणी सुमारे ६००० झाडे लावण्याचा मानस आहे. मेट्रो प्रकल्पाला सुरवात झाल्यापासून आजवर नागपुरात ६४% काम झाले असून हे काम यापुढे असेच सुरु राहणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Advertisement