Published On : Tue, Dec 25th, 2018

सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरेंवर प्राणघातक हल्ला

नागपूर : उपराजधानीतील प्राणीमित्र व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरे यांच्यावर मंगळवारी (25 डिसेंबर) सकाळी गुंडांनी हल्ला केला आहे. जनावरांवर हिंसा करणाऱ्यांविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. यामुळे संतप्त झालेल्या गुंडांनी मिरे यांच्यावर हल्ला केला.

मिरे यांच्या गांधीनगर येथील घरीच हा हल्ला झाला व गुंडांनी त्यांची कारदेखील फोडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिरे या हल्ल्याबाबत अंबाझरी पोलीस ठाण्यात द्यायला गेल्या असता पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास नकार दिला. मिरे या अनेक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करत असून कुठलेही अनुदान न घेता डॉग शेलटर चालवितात.