Published On : Fri, Sep 15th, 2017

नेमून दिलेले काम पुर्णपणे करणे ही समाजसेवाच – भालचंद्र खंडाईत

Advertisement

नागपूर: आपण प्रत्येकाने नेमून दिलेले काम संपुर्ण क्षमतेने, गुणवत्तापुर्वक आणि वेळीच पार पाडणे ही देखील एकप्रकारे देशसेवा आणि समाजसेवाच आहे, असे मनोगत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी व्यक्त केले. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी आयोजित अभियंता दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. तत्पुर्वी खंदाईत यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.

प्रत्येक अभियंत्याने त्याची जवाबदारी संपुर्ण क्षमतेने, गुणवत्तापुर्वक आणि वेळीच पार पाडल्यास महावितरणचे अस्तित्व कायम ठेवण्यासोबतच कंपनीची अधिकाधिक प्रगती साधणे शक्य आहे, अभियंता म्हणून आपले काम प्रशंसनिय आहे, ग्राहकांना अखंडित वीज मिळावी याकरिता आपण रात्रदिवस झटत असतो, अनेक अडचणींवर मात करीत आपण वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवित ग्राहक सेवेप्रती आपण एक अभियंता म्हणून सतत कार्यरत असतो.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऊर्जा क्षेत्रात आज अनेक आव्हाने आहेत, या सर्वांवर मात करण्यासाठी काळानुरुप होणा-या बदलाच्या अनुषंगाने आपल्यातही बदल होणे आवश्यक आहे, अभियांत्रीकी क्षेत्रात दरतासाला नवनवे तंत्रज्ञान उपलब्ध होत असल्याने अभियंत्यांनी स्वत:चे ज्ञान सदैव अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी अभियात्रिकीच्या सर्वच शाखांमधून आपले कार्य केले आहे, एक आदर्श अभियंता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आहेत, अभियंत्यांनी सदैव सकारात्मक विचारसरणी ठेवावी, असे आवाहनही खंडाईत यांनी केले.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या एकूणच कार्यव्याप्तीबाबत अविनाश लोखंडे, जयंत बानेरकर यांनी विस्तृत विवेचन केले. याप्रसंगी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू, दिलीप अंबादे, मनिष वाठ, नारायण आमझरे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनप्रवासावर विस्तृत प्रकाश टाकला तर सहाय्यक अभियंता राहुल कत्तूरवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपम्हाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) पांडूरंग वेळापुरे, कार्यकारी अभियंता निरज वैरागडे, सुभाषचंद्र सदामते, यांचेसह अभियंते व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement
Advertisement
Advertisement