Published On : Sun, Aug 18th, 2019

समाजकार्य महाविद्यालयाला विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्राप्त

कामठी :- येथील सामाजकार्य महाविद्यालयाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय व उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी असे दोन विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले.

पुरस्कार वितरण समारोहाच्या समारोहाच्या अध्यक्षस्थानी रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संपूर्ण बांबू प्रकल्प, मेळघाटचे अध्यक्ष श्री सुनील देशपांडे , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. केशव वाळके मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.रमेश सोमकुवर यांना राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट महाविद्यालय विद्यापीठस्तरीय पुरस्कार 2018-19 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता चिवंडे यांना राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी विद्यापीठस्तरीय पुरस्कार 2018-19 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम , प्रा. डॉ. राजश्री मेश्राम,डॉ.प्रणाली पाटील, प्रा.उज्जला सुखदेवे, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, प्रा.ओमप्रकाश कश्यप ,प्रा. निशांत माटे, प्रा. शशिकांत डांगे, प्रा. मनीष मुडे, प्रा. हर्षल गजभिये, प्रा. राहुल जुनगरी,प्रा. राम बुटके,प्रा. गिरीश आत्राम, प्रा.आवेसखर्नी शेख आदींनी डॉ. रमेश सोमकुवर व डॉ. सविता चिवंडे यांचे अभिनंदन केले.

संदीप कांबळे कामठी