Published On : Wed, Sep 19th, 2018

वडापाव विक्रेत्याची सामाजिक बांधिलकी – मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३६ हजारांची मदत

मुंबई : सामाजिक बांधिलकी जपत सायन येथील वडापाव विक्रेते मंगेश अहिवळे यांनी केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस 36 हजारांची मदत केली.

सायन येथील श्री. अहिवळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सायन येथील क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनी येथे भेट घेऊन 36 हजारांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.