Published On : Tue, Jun 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सरकारी खताच्या पोत्यांतून एचटीबीटी बियाण्यांची तस्करी उघड; 8.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : वाडी परिसरात पोलिस आणि कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश केला. सरकारी अनुदानित खताच्या पोत्यांमध्ये लपवून नेण्यात येणाऱ्या 798 बियाण्यांच्या पाकिटांसह सुमारे 8 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह एका संशयित तीनचाकी वाहनाची तपासणी केली. वाहनातील 13 प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये एनपीके खत भरलेले असल्याचे दिसत होते. मात्र, सखोल तपासणीदरम्यान त्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेली प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची 798 पाकिटे आढळून आली.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईत नागपूर येथील योगेश भीमराव डबारसे आणि समीर सुरेश काकडे यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमालामध्ये प्रतिबंधित बियाण्यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचाही समावेश आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी माल एका ठिकाणाहून उचलण्याचे काम दिल्याचे सांगितले. मात्र, मालाचा मूळ पुरवठादार आणि तो कुठे पोहोचवायचा होता याबाबत ते समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत.

Advertisement

दरम्यान, पोलिस आणि कृषी विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून तस्करीमागील मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
जपतलाई आश्रमशाला में तीन छात्राओं की मौत #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

जपतलाई आश्रमशाला में तीन छात्राओं की मौत #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

तिरंगे के रंगों में जगमगा उठा रत्नागिरी #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

तिरंगे के रंगों में जगमगा उठा रत्नागिरी #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

हरी मिर्च के भाव ने किसानों की बढ़ाई चिंता #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

हरी मिर्च के भाव ने किसानों की बढ़ाई चिंता #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...

अकोला पश्चिम चुनाव विवाद में स्ट्रॉन्ग रूम फिर खुली #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

अकोला पश्चिम चुनाव विवाद में स्ट्रॉन्ग रूम फिर खुली #maharashtranews #vidarbhanews #newsupdate...

CJP–NALSAR विवाद: छात्रों के विरोध से BCI के फैसले तक...

CJP–NALSAR विवाद: छात्रों के विरोध से BCI के फैसले तक...

गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges