Published On : Fri, Nov 15th, 2019

स्मार्ट सिटीची कामे जोरात सुरू – प्रकल्पग्रस्तांचे मोबदल्याची रक्कम अदा

नागपुर: केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत नागपूर शहर हे दुसऱ्या राउंडमध्ये अंतर्भुत झाले असले तरी 100 शहरांचे यादीत नागपूरने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. क्षेत्राधिष्ठीत विकासया घटका अंतर्गत पुर्व नागपूर येथील पारडी, भरतवाडा , पुनापूर व भांडेवाडी या भागातील 1730 एकर जागेवर टेंडरशुअर प्रोजेक्ट अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू झाली असून रस्त्यांमुळे बाधित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या बाधित होणाऱ्या मिळकतीचे रेडीरेकनरचे दराने नूकसानभरपाई देण्यात येत आहे. ज्या मिळकतीदारांची मिळकत (बांधकाम) अंशत: बाधित होत आहे.

त्या मिळकतदारांचे खात्यात NSSCDCL तर्फे नूकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आलेली आहे व त्यांच्या मिळकतीचा भाग तोडण्यात आलेला आहे. भवानी माता मंदीराजवळील रस्त्यामुळे 7 मिळकती पूर्णत: बाधित होत असून त्यापैकी 6 मिळकती (राहती घरे) पाडण्यात आलेल्या असून तेथील रहीवासी किरायाचे घरात राहण्यास गेले आहेत. त्यांची किरायाची रक्कम सुदधा स्मार्ट सिटी तर्फे अदा करण्यात येत असून पूर्णत: मिळकत बाधित होणाऱ्या मिळकतदारांना त्यांचे मुळ भूखंडाचे 60% क्षेत्रफळाचा विकसीत भूखंड व त्यांचे मुळ घरांचे बांधकामाचे क्षेत्रफळा इतके नविन घर बांधण्यासाठी लागणारी रक्कम सद्याचे रेडीरेकनर दराने देण्यात येत आहे.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे पुनर्वसन धोरणानूसार कार्यवाही करण्यात येत असून एकूण रक्कम तीन हप्त्यांमध्ये मिळकतदाराचे बँकेत थेट जमा करण्यात येणार आहे. यातील पहिला हप्ता बाधित मिळकतदाराने रू. १०० चे स्टँम्प पेपर वर नोटराइज संमतीपत्र सादर केल्यानंतर लगेच, व दुसरा हप्ता मिळकतीचा बाधित भाग तोडल्यानंतर लगेच आणि तिसरा हप्ता जागेची Clear Title Document (जागा अकृषक झाल्याचा आदेश व सिटी सर्व्हेची आखिवपत्रिका इ.) सादर केल्यानंतर लगेच अश्या पदधतीने देण्यात येत आहे.आतापर्यंत रु. 1 कोटीचे वर रक्कम बाधित मिळकतदारांचे खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

ज्या रहीवाशांचा व्यवसाय बाधित होत आहे त्यांना सुदधा पुनर्वसनधोरणानूसार उचित मोबदला व नूकसानभरपाई देण्यात आलेली आहे. तसेच त्या भागात एफएसआय ३ पर्यंत देण्यात येणार आहे.