Published On : Fri, Nov 15th, 2019

माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा कामठी विधानसभा क्षेत्रात दुष्काळ पाहणी दौरा

स्लग:-नुकसानग्रस्त धान पिकाची “केली पाहणी

कामठी :-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसानीची जाणोव घेत नागपूर जिल्ह्यातील दुष्काळ ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी आज 14 ऑक्टोबर ला नागपूर जिल्ह्यातील काटोल कामठी व उमरेड विधानसभा क्षेत्रातील नुकसानग्रस्त भागाची दुष्काळ पाहणी दौरा केला यानुसार दुपारी 3 वाजता कामठी विधानसभा क्षेत्रातील आसोली व सावळी भागातील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या शेतातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

कामठी तालुक्यात खरीप हंगामात 20 हजार 600 हॅकटर क्षेत्राखाली शेतपिकी करण्यात आली यातील 10 हजार 400 हॅकटर क्षेत्राखाली धानपिकाची लागवड करण्यात आली ज्यातील मागील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे 591 हॅकटर क्षेत्रात धानपिकाचे मोठे अतोनात नुकसान झाल्याची माहिती आहे. आजच्या या नुकसानग्रस्त दुष्काळी दौऱ्यात माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी कामठी तालुक्यातील आसोली येथील बहिणाबाई धवड यांच्या शेतात भेट देऊन नुकसानग्रस्त धानपिकाची पाहणी केली

यावेळी यांनी सर्व्हे क्र 17/1मध्ये 1.05हॅकटर क्षेत्रात धानपिकाची लागवड केली ज्यामध्ये धानपिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले तसेच आसोली येथील नुकसानग्रस्त शेतकरी रामदास ढोगे यांनी डोळ्यातून अश्रू ढाळत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या समोर व्यथा मांडली धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती देऊन धानपीक शेतकऱ्यांना प्रति एकर 30 हजार रुपये शासणाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.तसेच सावळी येथील प्रवीण नामदेव इंगोले यांच्या शेतात भेट देऊन नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली यावेळी शेतकरी प्रवीण इंगोले यांनी सर्व्हे क्र 56/2मध्ये 2.43हॅकटर क्षेत्रात धानाच्या शेतपिकांची लागवड केली ज्यामध्ये धानपिकाचे पूर्णता नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

कामठी मौदा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान,सोयाबीन,कापूस पीक शेतकरी घेते असतात 5 सप्टेंबरला व ऑक्टोबर ला झालेल्या अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात तिन्ही पिकाचे नुकसान झाले होते त्यानंतरही बऱ्याच शेतकऱयांनी धान पिकाची रोवणी केली सतत पडलेल्या पावसामुळे धान पीक उत्तम येणार अशी शेतकऱयांना आशा असताना दिवाळी दरम्यान झालेल्या वादळी मुसळधार पावसाने सर्व धान पीक पाण्यात झोपल्या गेले याप्रसंगी जाणता राजा शरद पवार यांनी धान पिकाचे नुकसान, लागणारा खर्च, पंचनामे झाले काय याबाबत विचारपूस केली , असोली येथील नामदेवराव इंगोले यांचे बारा एकरात धान ,प्रवीण निदान यांचे नऊ एकर ललित वैरागडे यांची दहा एकर, संजय ठाकरे यांची चार एकर ,तुकडुदास आपटूरकर याचेचार एकर भीमराव चंडीमेश्राम यांचे तीन एकराातील तसेच जनार्दन ढोंगे व सावळी गारला येथील चंद्रभान इंगोले तसेच टेमसना येथील शेतकऱ्यांच्या धान पीकांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले असून महालगाव येथील सरपंच दिपाली चणेकर ग्रामपंचायत सदस्य अमृत पांडे शेषराव वानखेडे भगवान निदान दिलीप मुळे यांनी कृृषी अधिकारी, कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात बसून पंचनामे करत असून शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे केले नसल्याची तक्रार केली सर्व शेतकरयाना 30 हजार रुपये प्रति एकर नुुुकसान भरपाई देण्याची मागणी केली यावेळी माजी राज्यमंत्री व काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार आणिल देशमुख,उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे, नागपूर जिल्हा ग्रा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार प्रकाश गजभिये , नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर , कामठी तालुका ग्रा महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.अवंतिका लेकुरवाळे , नागपूर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष अर्चना विनोद हरडे , राष्ट्रवादी चे पदाधिकारी नौशाद सिद्दीकी, शोएब असद, कामठी तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश ढोले, केम ग्रा प चे उपसरपंच अतुल बाळबुधे, माजी सरपंच अमोल खोडके, विजय खोडके, रमेश लेकुरवाडे, हरिश्चंद्र जगताप ,ज्ञानेश्वर गावंडे, खैरी चे माजी सरपंच किशोर धांडे, युवक काँग्रेसचे अनुराग भोयर, ललित वैरागडे यासह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते तसेच तहसीलदार अरविंद हिंगे , पंचायत समिती चे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत , उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी