Published On : Mon, Sep 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

मिरजमध्ये शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला; २ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली

Advertisement

मिरजमध्ये शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला; २ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली

मिरज : मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या नवीन कमानीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असतानाच अचानक बांधकामाचा भाग कोसळला. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

स्लॅब कोसळताच काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. बचाव पथकाने आतापर्यंत पाच ते सहा कामगारांना बाहेर काढले असून, उर्वरित कामगारांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान, कमानीच्या बांधकामासाठी स्लॅब टाकण्याचे काम सुरू असतानाच तो अचानक कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत आणि जखमींची नेमकी संख्या प्रशासनाकडून अधिकृतपणे स्पष्ट होणे बाकी असून, बचावकार्य अद्याप सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.