Published On : Tue, Mar 3rd, 2020

अवैद्य दारु विक्री ठिकाणी छापे टाकून १० व्यक्तीना अटक

Advertisement

– ४ लाख ९० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त, महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार केली कारवाई

रामटेक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलीस विभागास सोबत घेऊन केळवद हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणी व कळमना तसेच यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य दारु विक्री ठिकाणी छापे टाकून १० व्यक्तीना अटक करुन दारुबंदी गुन्ह्यातील रुपये ४ लाख ९० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

– सदरची कारवाई जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त व अधीक्षक ग्रामीण तसेच विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रमोद सोनोने यांच्या आदेशा नुसार निरीक्षक मुरलीधर कोडापे यांनी *केळवद* व रावसाहेब कोरे यांनी *कळमना* *यशोधरा नगर* हद्दीत विशेष मोहीम राबविली. √ या विशेष मोहिमेत पोलीस उप अधिक्षक अशोक सरबरकर, पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी, API पंकज वाघोडे, PSI अर्जुन राठोड इत्यादी अधिकारी व स्टाफ या विशेष मोहिमेत सहभागी होते.

या कारवाई मध्ये 200 लिटर क्षमतेचे प्लास्टिक चे 70 व भट्टी ब्यारेल 15 तसेच लोखंडी ब्यारेल 30 रसायन, 15 हजार लिटर सडवा, 350 लिटर मोहा दारु, 22 लिटर देशी दारु, व दारुबंदी गुन्ह्यातील साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी *कळमना हद्दीतील* (१) सुशील सुनील गुद्दे, (२) संतोष बाबूलाल शिरसाठ, (३) सचिन महादेवराव तिडके, (४) गोपी लुच कचवा, (५) प्रवीण गजानन सातपैसे तसेच *यशोधरा नगर हद्दीतील* (६) ईश्वर लालाजी मेश्राम, (७) शांताबाई बाबूलाल हुमे, (८) मालती बाबूलालजी हुमे, (९) सावित्रीबाई जागोजी पराते, (१०) संतोष मुन्नालाल शाहू इत्यादींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे वर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार कारवाई करण्यात आली आहे. √ या विशेष मोहिमेत दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, बाळू भगत, अनिल जुमडे, मुकुंद चिटमटवार, रवी सोनोने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रशांत येरपुडे, कॉन्स्टेबल निलेश पांडे, राहुल पवार, मिलिंद गायगवळी, आशिष वाकोडे, संजय राठोड, समीर सईद, रवी इंगोले, महिला जवान सोनाली खांडेकर, धनश्री डोंगरे व वाहन चालक रवी निकाळजे, सुभाष शिंदे व देवेश कोटे यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली.