Published On : Thu, Jun 13th, 2019

महा मेट्रो : रिच-३ (सिताबर्डी ते लोकमान्य नगर) व्हायाडक्टचे १०० टक्के कार्य पूर्ण

Advertisement

रिच – ३ येथे लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस

नागपूर : महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच-३ मधील व्हायाडक्टचे १०० टक्के कार्य महा मेट्रोने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश मिळवले दिनांक १ डिसेंबर २०१६ रोजी सिताबर्डी ते लोकमान्य नगर व्हायाडक्टच्या कार्याला सुरुवात करण्यात आली होती.सरासरी १ दिवसात ४ सेगमेंट तयार करून केवळ अडीच वर्षाच्या कालावधीत ११ कि.मी. मार्गावर सुमारे ३९३ पियर वर ३५६४ सेगमेंट लॉचिंग करत महा मेट्रोने व्हायाडक्टचे कार्य पूर्ण केले.

ज्यामध्ये ३९३ फाउंडेशन,३९३ पियर,३५६४ सेगमेंट कास्टिंग,२६६ ओपन फाऊंडेशन,५५८ पाईल,३१८ पाईल कॅप,१४९ आय गर्डर कास्टिंग,३३ डेक स्लॅब कास्टिंग,१२७ पाईल कॅप,३४५ सेग्मेंट स्पॅन लॉचिंग,६१ कॉनकॉर्स आणि ट्रॅक आर्म्सची कार्य पूर्ण करण्यात आली. हिंगणा येथील मेट्रोच्या कास्टिंग यार्ड मध्ये या व्हायाडक्टचे सर्व सेगमेंट तयार करण्यात आले. विशेष बाब म्हणजे सदर मार्गिकेवरील प्रकल्पाचे निर्माण कार्य करतांना २५ मी. च्या उंचीवर झासी राणी चौक येथील शहीद गोवारी उड्डाणपूल येथे सिमेंट गर्डरचे यशस्वीरित्या लॉचिंग करण्यात आले.

सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती,कॉलेज,शासकीय कार्यालय,अंबाझरी ई. कार्यालय असल्यामुळे या मार्गिकेवर सतत वाहनांची रहदारी असते अश्या परिस्थितीत कार्य करतांना ट्राफिक व सिव्हील कार्याचे योग्य नियोजन करत महा मेट्रोने या ठिकाणचे कार्य पूर्ण केले.

मुख्य म्हणजे वर्धा मार्गावरिल (रिच-१) याठिकाणी मेट्रो सेवा सुरु झाली असून हिंगणा मार्गावरील (रिच-३) येथे लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. निर्धारित वेळेत व सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सदर कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हिंगणा येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि महाविद्यालये आहेत,त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या सर्व प्रवाश्यांना लवकरात लवकर मेट्रोची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महा मेट्रोचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. या मार्गावर महा मेट्रो द्वारे तयार करण्यात आलेले लिटील वूड व अंबाझरी तलाव या ठिकाणी व्ह्यूइंग गॅलरी तयार केली जात असून मेट्रो प्रवाश्यांना प्रवास करतांना विहंगम असे दृश बघायला मिळेल.