Published On : Thu, Jun 13th, 2019

हरदोली जि बालघाट ते पंढरपुर पायदळ वारकरी वारी चे स्वागत

Advertisement

कन्हान : – हभप श्रीराम ठाकरे महाराज सह वारकरी मु हरदोली जि बालघाट ते पंढरपुर पायदळ वारकरी वारी चे घारड परिवाराव्दारे खंडाळा येथे भव्य स्वागत करण्यात आले.

आषाढी एकादशीच्या पंढरपुर यात्रे करिता मु हरदोली ता तिरोडी जि बालाघाट येथील हभप श्रीराम हिरालाल जी ठाकरे महाराज सह २५ वारक-यांची दुसऱ्या वर्षी पायदळ वारी निघाली. तारसा रोडनी खंडाळा (निलज) येथील श्री बाळकृष्णाजी घारड यांच्या शेतातील विठ्ठल रूखमाई मंदीरात घारड परिवार व्दारे भव्य स्वागत करून जेवन व रात्री मुक्काम करण्यात आला. बुधवार (दि.१२) ला सकाळी चाय नास्ता करून नागपुर मार्गे पंढरपुर करिता भगवा ध्वज फडकवित भजनाच्या तालात पायदळ वारीचे प्रस्थान करण्यात आले. याप्रसंगी हभप विनोद सोनवणे, रूपचंंद गौतम, लखनलाल मेहर, गुलाबराव सावरकर, सौ बाली राऊत, राजवंती गडेकर, निलनताई सहारे, दिपाली सहारे, खेमराज चौधरी, वामन देशमुख, ओमप्रकाश मेश्राम, रत्नाकर घारड, मधुकर खडसे, राजेश पोटभरे, राजहंस वंजारी, जयेश कापसे आदीसह गावकरी भाविकांनी उपस्थित राहुन एका महिन्या च्या पंढरपुर पायदळ वारीचे स्वागत केले.