Published On : Sat, Aug 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दुकान मालकाला मारण्यासाठी आला, कर्मचाऱ्यालाच चाकूने भोसकले!

Advertisement

नागपूर : सीताबर्डी मुख्य बाजार परिसरात फुटपाथवर चपलांचे दुकान लावण्यास विरोध केल्याच्या रागातून एका युवकाने रेडीमेड कपड्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दुकान मालकाला लक्ष्य करण्यासाठी आलेल्या आरोपीने मालक घटनास्थळी न मिळाल्याने कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रमेश खंगार यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत वार चुकवला. त्यानंतर आरोपीने केलेल्या हल्ल्यात त्यांच्या हनुवटीला गंभीर दुखापत झाली, तर बचाव करताना हातालाही चाकू लागला.

दुकान मालकावर होती आरोपीची खुन्नस-
ही घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास वैरायटी चौक परिसरातील गारमेंट हाऊस या रेडीमेड कपड्यांच्या दुकानासमोर घडली. ३८ वर्षीय रमेश खंगार हे कलमना परिसरात राहतात आणि या दुकानात कर्मचारी म्हणून काम करतात. घटनेच्या वेळी ते दुकानाबाहेर बसले होते. त्याचवेळी आरोपी अचानक तेथे आला आणि चाकूने रमेश यांच्यावर हल्ला केला.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपीने रमेश यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रमेश यांनी स्वतःचा बचाव केल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर चाकूच्या वारामुळे त्यांच्या हनुवटीला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यापासून बचाव करताना त्यांच्या हातालाही चाकू लागला.

दुकान मालकाऐवजी कर्मचाऱ्यावर हल्ला-
रमेश यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांची गर्दी होत असल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी रमेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisement

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना हल्ल्यामागील कारण समोर आले. सक्करदरा परिसरातील रहिवासी काजी समसुद्दीन उर्फ सोनू हा फुटपाथवर चपलांचे दुकान लावत होता. दुकान मालकाने त्याला फुटपाथवर दुकान लावण्यास विरोध केला होता. याच कारणावरून आरोपीच्या मनात दुकान मालकाविषयी राग होता.

घटनेच्या दिवशी आरोपी दुकान मालकावर हल्ला करण्याच्या उद्देशाने तेथे आला होता. मात्र दुकान मालक त्यावेळी उपस्थित नसल्याने त्याने दुकानातील कर्मचारी रमेश यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सीताबर्डी पोलिसांची कारवाई-
या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी काजी समसुद्दीन उर्फ सोनू याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.