Published On : Wed, Apr 22nd, 2020

साहेब ,मला माझ्या पत्नीकडे जाऊ द्या हो!

कामठी :- कोरोनाच्या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यात लागू असलेल्या लॉकडाऊन मध्ये कढोली गावात अडकलेल्या एका मजुराने ओडीसा येथे असलेल्या गर्भवती पत्नीच्या भेटीसाठी परवानगी मिळण्यास्तव थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ला अर्ज केल्यावर प्रशासनाने तत्काळ दखल घेत नागपूर जिल्हा परिषद चे जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ओडीसा राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी केलेल्या संपर्काला यश येत त्वरित एकटी भाड्याच्या खोलीत व मदतीच्या अपेक्षित असलेल्या या मजुरांच्या गर्भवती पत्नीला प्रशासनानेच आई वडिलांची भूमिका घेत तेथील भोसमा पोलीस विभाग तसेच आरोग्य विभागाने 20 एप्रिल ला त्वरित भेट देत तिची वैद्यकीय तपासणी करून पुढील सोयी सुविधेसाठी नजीकच्या निवारा केंद्रात हलविले मात्र तेथील आसामी फूड या महिलेला नकोसे असल्याने तिला समाधान प्राप्त होत नाही तेव्हा अशा गर्भवती स्थितीत मायेची उब भरणारे आई वडील किंवा पती अनावधनाने सोबतीला नसल्याने

या महिलेची कुचंबणा च होत आहे यासंदर्भात लॉकडॉउन च्या कचाट्यात अडकलेला हा मजूर कढोली वरून ओडीसा राज्यात जाण्याची आर्त हाक देत ‘साहेब मला माझ्या पत्नीकडे जाऊ द्या हो’अशी नतमस्तक विनवणी प्रशासनाला करीत आहे विनवणी करणाऱ्या या मजुरांचे नाव सुजित अमित बिस्वास रा खिरडीपूर जिल्हा नदिरा (वेस्ट बंगाल)असे आहे.तर पतीच्या आठवणीत प्रतीक्षेत असलेल्या या पत्नी चे नाव पिंका (विश्वास रॉय)असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मजूर व त्याची पत्नी डिसेंबर 2017 मध्ये विवाहबद्ध झाले .सदर मजूर हा ओडोसाच्या सुंदरगढ जिल्ह्यातील डारलीपाली येथे जाऊन एक वर्ष कंत्राटी पद्धतीत काम केले तर तिथेच भाड्याने वास्तव्यास होते काम करीत असलेल्या कंपनीकडील काम संपल्याने बेरोजगार झालेल्या या मजुराने नागपूर गाठून कामठी तालुक्यातील कढोली येथे कंत्राटी पद्धतीने रेल्वे च्या उपयोगात येणारे सिमेंट खांब तयार करण्याचे काम करीत असता काम सुरळीत सुरू असताना 17 मार्च 2020 ला पत्नी कडे भेट देऊन सुदधा आला होता तर कामाचा पगार घेऊन पत्नीच्या प्रसूती कामात येतील या आशेतून ओडीसा हुन परत कढोली ला परतला मात्र अचानक 24 मार्च पासून कोरोना विषाणूच्या पश्वरभूमीवर लागू झालेल्या लॉक डाऊन मध्ये अडकलेला हा मजूर पत्नी कडे जाणे शक्य होत नसल्याने पत्नी शी मोबाईल च्या व्हिडीओ कॉल ने परिस्थितीची जाणीव घेतो .


यावेळी पत्नी ने मदतिची गरज असल्याचे जाणीव करून देताच या मजूर पतो ची तळमळ झाली एकीकडे प्रशासन ओडीसा ला जाण्याची परवानगी देत नाही हाच नियम पश्चिम बंगाल मध्येही लागू असल्याने आई वडील सुद्धा ओडीसा ला सुने कडे जाऊ शकत नाहो अशा परिस्थितीत भाड्यच्या खोलीत असलेल्या या गर्भवती महिलेची काळजी घेण्याची उद्देशाने सुजित बिस्वास ने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ला पत्र लिहून प्रशासनाला जागृत केले दरम्यान 15 एप्रिल झालेलया वादळी पावसात कढोली गावातील या मजुरांचे निवऱ्याची सोय असलेली तंबू निकामी झाल्याने याची निवाऱ्याची व जेवणाची सोय करून देण्यात आली तसेच या लॉक डाऊन च्या स्थितीत कायद्याच्या चौकटीत राहून तेथील ओडीसा राज्यातील भोसमा च्या आरोग्य व पोलीस विभागाने तात्काळ पिंका रॉय यांच्या मदतीला धावून जात नजीकच्या निवारा केंद्रात सोय करून दिली मात्र तेथील पोषक वातावरण व तेथील जेवण या महिलेला असह्य होत असल्याने ही आपल्या भाड्याच्या खोलीतच परत जाण्याची मागणी करीत आहे त्यातच पत्नीच्या आठवणीत आतुरलेलया या पतीला जन्माला येणाऱ्या बाळाची व पत्नीची चिंता अधिकच होत असल्याने मायेची उब देणाऱ्या या पतीला प्रशासनाने त्याच्या पत्नीकडे जाऊ देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी चिंतातुर सुजित बीश्वास यांनी केले आहे

संदीप कांबळे