Published On : Wed, Apr 22nd, 2020

नऊ जुगाऱ्याना अटक , दहा हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बुद्धनगर येथील राहूल बुद्ध विहार जवळ राजकुमार यादव यांच्या घराजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी वेळीच या जुगार अड्यावर धाड घालून 9 जुगाऱ्याना अटक करोत त्यांच्याकडून विविध कंपणीचे 4 मोबाईल व नगदी 3 हजार 800 रुपये व 52 तास पत्ते असा एकूण 10 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची यशस्वी कारवाही गतरात्री केली .

अटक नऊ जुगाऱ्यात नवल उर्फ मोंटू रंगारी वय 27 वर्षे रा बुद्धनगर कामठी, प्रवीण शनेश्वर वय 30 वर्षे रा नया गोदाम कामठी, सौरभ इंगोले वय 21 वर्षे रा नया गोदाम कामठी, निखिल रंगारी वय 30 वर्षे रा जयभीम चौक कामठी, प्रथम ऊर्फ सुहास मेश्राम वय 26 वर्षे रा जयभीम चौक कामठी, नितेश मेश्राम वय 30 वर्षे रा जयभीम चौक कामठी, उमेश उर्फ हाग्या सुखदेवे वय 32 वर्षे रा जयभीम चौक कामठी, महेश रंगारी वय 38 वर्षे रा बुद्ध नगर कामठी, रमेश वैद्य वय 57 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल, एसीपी राजरतन बन्सोड यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद धोंगडे , डी बी स्कॉड चे ज्ञानचंद दुबे,मंगेश गिरी, प्रमोद वाघ, वेदप्रकाश यादव, ललित शेंडे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे