Published On : Fri, Jun 8th, 2018

सामाईक प्रवेश परीक्षांसाठी आता एकच कक्ष; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली कार्यालयाची पाहणी

Advertisement

मुंबई : वैद्यकीय शिक्षणासह विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व सामाईक प्रवेश परीक्षा आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. मुंबईच्या फोर्ट भागात नुकत्याच स्थलांतरित झालेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आणि प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयाची आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाहणी केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. तावडे यांनी दहावीचा निकाल 89 टक्के लागला आहे. असे सांगून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची महिनाभरात फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे, असे सांगून कलमापन चाचणीचा निकाल आणि पालकांचे समुपदेशन याचा विचार करुन कौशल्य आधारित परीक्षा विद्यार्थ्यांनी देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, उच्च शिक्षण, आयुष, कला, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय या अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि पालकांसाठी देखील स्वतंत्र मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी, शाळा सोडल्याचे दाखले आदींची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगून श्री. तावडे यांनी यंदा दहावी-बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लागला त्याबद्दल शिक्षक आणि शिक्षक संघटनांचे आभार मानले.

केंद्र शासनाच्या नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर म्हणजेच ‘नाटा’ मार्फत घेण्यात येणाऱ्या आर्किटेक्चर परीक्षेत काही अडचणी आहेत, त्यासंदर्भात केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सीईटी आयुक्त आनंद रायते उपस्थित होते.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तसेच प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयांचे मुख्य कार्यालय दिनांक १ जूनपासून फोर्ट येथे स्थलांतरित झाले आहे. या कार्यालयात स्वतंत्र प्रशासकीय कक्ष, वैधानिक कक्ष, माहिती तंत्रज्ञान कक्ष, लेखा कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

विद्यार्थी आणि पालकांसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क
विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सोयीसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क सीईटी कक्षात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
तंत्रशिक्षण – 022-22652261/62/9665975609
वैद्यकीय शिक्षण -9769199421/7738781743
उच्च शिक्षण-022-26473719/020-26051729

याबरोबरच अधिक माहितीसाठी आणि संपर्कासाठी खालील संकेतस्थळे आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
संकेतस्थळ – www.mahacet.org/www.sspnsamiti.gov.in
ईमेल – Maharashtra.cetcell@gmail.com आणि Maharashtra.ara@gmail.com
दूरध्वनी क्रंमाक – 022-22016153/22016157/22016159

Advertisement
Advertisement