महालक्ष्मी अय्यर यांचे मत, वर्धमान नगरात रंगला ‘ मैं लता’
लहानपणापणापासून लतादिदींची मी फॅन राहिली आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे मी अनेक गुरूंकडून शिक्षण घेतले त्यातल्या एक गुरू लतादिदी आहेत. पण त्या माझ्या सायलेंट गुरू आहेत. त्यांची गायकी, उच्चारण, फील, गाण्यांची समज आणि त्यांना निभावण्याची हातोटी अशा अनेक गोष्टी त्यांचे निरीक्षण करता करता शिकता आल्या् निभावले, त्यातून शिकत गेले, असे मत सुप्रसिद्ध गायिका महालक्ष्मी अय्यर यांनी व्यक्त केले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवात आयोजित ‘मैं लता’ या लता मंगेशकर यांच्या लोकप्रिय गीतांच्या कार्यक्रमासाठी महालक्ष्मी अय्यर मागील तीन दिवसांपासून नागपुरात आहेत.
लता दिदींच्या गीतांच्या कार्यक्रम करायचा म्हणजे एक दडपण असते, जबाबदारीची जाणीव असते. आपण कोणते गाणे निवडायचे, ते चांगला निभावता येईल का, त्यातून आपल्याला आनंद मिळेल का, रसिकांची काय प्रतिक्रिया राहील, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. त्यांचे एखादे गाणे ऐकावे तर वाटते खूप सोपे आहे पण गायला जावे तर त्यातील बारीक-बारीक जागा, एक्स्प्रेशन तेव्हा लक्षात येतात आणि लतादिदींनी किती मेहनतीने गाणे गायिले आहे, याची प्रचिती येते, असे महालक्ष्मी अय्यर म्हणाल्या.
लता मंगेशकर यांचे ‘लग जा गले’ हे महालक्ष्मी यांचे अत्यंत आवडते गाणे आहे. हे गाणे जेव्हा जेव्हा मी ऐकते तेव्हा, त्यात नवीन काहीतरी सापडते. त्यातला आवाजाचे थ्रो, हॉन्टींग क्वालिटी खूप आवडते असे त्या म्हणाल्या. लता दिदी 90 वर्षाच्या झाल्या. मधल्या काळात त्यांची तब्येत खराब होती. कालच त्या पूर्णपणे ब-या होऊन घरी परत आल्या आहेत. त्यांना माइलड निमोनिया झाला पण डॉक्टरांनी सांगितले की त्यांचे फुफफुस खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणूनच त्या इतकी वर्ष इतकी चांगली गीते आपल्याला देऊ शकल्या. त्या आजही आपल्यासोबत आहेत, हे आपले सौभाग््यच आहे, असे महालक्ष्मी अय्यर म्हणाल्या.
वर्धमान नगर येथे झाले झालेल्या मंगळवारी झालेल्या ‘मै लता’ या कार्यक्रमाला पाटीदार समाजाचे नरसीभाई पटेल, जलाराम मंदिरचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर, प्रा. अनिल सेाले, आ. कृष्णाजी खोपडे, उपमहापौर मनीषा कोठे, नगरसेवक बाल्या बोरकर, प्रमोद पेंडके, प्रविण दटके, महेंद्र राऊत, मनीषा धावडे, कांता लारोकर, राजकुमार शेलोटे, यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले. स्वरदा गोखले हिने आएगा आनेवाला या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर शरयू दाते, महालक्ष्मी अय्यर, प्रशांत नासरे या गायकांनी वो चांद खिला, ओ सजना, तेरे मेरे मिलन की, जा रे उड जा, सावन का महिना अशी विविध गीते सादर केली. महालक्ष्मी अय्यर यांच्या वंदेमातरम् या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
खासदार सांस्कृतिक महोत्सव हा 17 दिवसांचा असतो येथे सर्व कलांचा संगम होतो, हे ऐकून आश्चर्यच वाटले. देशभरातून कलाकार येथे आपली कला सादर करायला येतात आणि येथील रसिकही त्यांना भरभरून दाद देतात. नितीन गडकरीं यांनी खूप मोठे काम केले आहेत, हे राष्ट्रीय एकतेचे प्रतिक झाला आहे. जगातला असा एकमेव महोत्सव आहे.
आज महोत्सवात
पराग माटेगावकर प्रस्तुत ‘आनंद वन भुवनी’ हा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम रामनगर मैदानावर सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध गायक नंदेश उमप, स्वरदा गोखले, राहूल जोशी व प्रसेनजीत कोसंबी यांचा त्यात सहभाग राहील.
