नागपूर : विदर्भातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विदर्भातील शाळा आता २२ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत शाळा सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी न्यायालयात केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान विदर्भातील सध्याच्या तीव्र उष्णतेची दखल घेत न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा सुरू करण्यास आणखी आठ दिवसांची मुदत दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने शाळा उशिरा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे विदर्भातील सर्व शाळा आता ३० जूनपासून सुरू होतील. यापूर्वी २२ जूनपासून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय रद्द करण्यात आला असून विद्यार्थ्यांना काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे.
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...
व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam
ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...





