नागपूर – नागपुरातील सिद्धेश्वरी झोपडपट्टीतून समोर आलेली परिस्थिती माणुसकीला हादरवणारी ठरत आहे. गेल्या तब्बल 20 दिवसांपासून येथील शेकडो गरीब कुटुंबे अंधारात जीवन जगत आहेत. प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानात वीज नसल्याने नागरिकांचे हाल अक्षरशः असह्य झाले आहेत. या गंभीर परिस्थितीत एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत असून पिण्याच्या पाण्यापासून ते दैनंदिन जगण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट कठीण बनली आहे. उकाड्यामुळे अनेकांची तब्येत बिघडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सदर येथील MSEB कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “आम्हाला वीज द्या, जगण्याचा हक्क द्या” अशी मागणी आंदोलकांनी केली. तरुणीच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे होणार का? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला.
दरम्यान, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी पारस बैसवारे यांनी सिद्धेश्वरी नगर परिसराला भेट दिली. नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक घरांमध्ये रात्री लहान मुले झोपत नसल्याचे, वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे चित्र समोर आले.
सिद्धेश्वरी झोपडपट्टीतील हा वीज प्रश्न आता केवळ सुविधेचा मुद्दा राहिलेला नाही, तर तो थेट नागरिकांच्या जीवाशी संबंधित गंभीर प्रश्न बनला आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





